पुणे शहरातील बाजीराव रस्त्यावर ‘माया टोळी’कडून कोयत्याने हल्ला…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील अतिशय वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या तिघांवर आरोपींनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील गजबजलेल्या बाजीराव रस्त्यावरून तीन जण दुचाकीवरून जात होते. मागून दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी […]
अधिक वाचा...Video: गणेश काळे याचा पाठलाग केला अन् चार गोळ्या झाडल्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा परिसरातील गणेश काळे या रिक्षा चालकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून गणेश काळे याची हत्या झाल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर चारही आरोपी पळून गेले होते. या चारपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. […]
अधिक वाचा...पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…
पुणे : पत्नी आणि मुलींच्या त्रासाला कंटाळून पर्वती येथील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या म्हाडाच्या एका वरिष्ठ लिपिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बहिणीला व्हिडीओ कॉल करत आता मी जातो आहे, पण ताई त्यांना सोडू नको, असे म्हणत जीवन संपवले. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यामुळे पर्वती परिसरात खळबळ उडाली आहे. नितिन […]
अधिक वाचा...पुणे! तुझ्यामुळे आम्हाला तुरुंगात जावं लागलं, थेट कोयत्याने वार…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर दोन जणांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्या उर्फ विष्णू लक्ष्मण होसमणी (वय 23, रा. इंदिरानगर, खडडा, गुलटेकडी) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. तर भिमराव […]
अधिक वाचा...पुणे! सारसबागेत दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी…
पुणे: पुणे शहरातील सारसबाग दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमादरम्यान धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये आज (बुधवार) वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. मात्र, सारस बागेत तैनात असलेल्या कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत हा वाद मिटवला. ही घटना वगळता सारसबाग येथील पाडवा पहाट कार्यक्रमात अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सारसबागमध्ये […]
अधिक वाचा...लातूर! फ्रेशर्स पार्टीत डान्स करताना एकमेकांना धक्का लागला अन् जीव गेला…
लातूर: फ्रेशर्स पार्टीत डान्स करत असताना धक्का लागल्याच्या कारणातून एका महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लातूर येथील जीवनरेखा महाविद्यालयात ही घटना घडली. सुरज धोंडीराम शिंदे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तो लातूर शहरातील जीवनरेखा महाविद्यालयात […]
अधिक वाचा...लातूरमध्ये भरदिवसा शिक्षकाची छातीत सुरा खुपसून हत्या…
लातूर: लातूर शहरात एका शिक्षकाच्या छातीत सुरा खुपसून त्यांचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लातूर शहरातील ही घटना मेघराजनगर परिसरात घडली. रामेश्वर बाबू बिरादार (वय ३५, सावरगाव, ता. देवणी) असे हत्या झालेल्या शिक्षकाच नाव आहे. […]
अधिक वाचा...सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य…
सांगली : सासरच्या छळाला कंटाळून युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इस्लामपूर येथे घडली आहे. विशेष म्हणजे तिचा प्रेमविवाह झाला होता. सासूच्या औषधोपचारासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्यासाठी नवविवाहिता अमृता ऋषिकेश गुरव हिचा छळ करण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून तिने शुक्रवारी विषारी द्रव प्राशन केले आणि रविवारी (ता. ५) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या […]
अधिक वाचा...नांदेड! जीवलग मित्राची वाईट नजर पत्नीवर असल्याचा संशय अन् क्रूरपणे हत्या…
नांदेड : एका युवकाने आपल्या जीवलग मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नायगाव तालुक्यात घडली आहे. आरोपीने मित्राची क्रूरपणे हत्या केल्यानंतर दुचाकीतील पेट्रोल वापरून मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पण गडगा कौठा रस्त्यावर अर्धवट जळालेल्या मृतदेह सापडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. शेख अब्बास शेख रमजानसाब असे […]
अधिक वाचा...कोल्हापूर! पत्नीचा खून केलाय; मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही…
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकल्यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहिणी पाटील असे मृत महिलेचे नाव तर प्रशांत पाटील असे पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पळून गेलेल्या प्रशांत पाटील याला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील याने सोमवारी रात्री साडेआठच्या […]
अधिक वाचा...
