
प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…
नवी दिल्लीः नोएडा येथे अंजली राठोड या युवतीची हत्या झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पण, पोलिसांनी तपासादरम्यान प्रियकराला अटक केली आहे. प्रेमसंबंधातून त्याने हत्या केल्याचे तपासादरम्यान सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अंजली ही सोमवारी (ता. १३) सकाळी सहा वाजता चालण्यासाठी घराबाहेर गेली होती. यावेळी तिची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरवात केली होती. पोलिसांनी तपासादरम्यान अश्विन या प्रियकराला अटक केली आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे.
अंजलीच्या हत्येपूर्वी एक दिवस अगोदर दोघांमध्ये चर्चा झाली होती. अंजलीने हत्येच्या दिवशी सकाळी प्रियकराला फोन केला आणि प्रेमसंबंध पुढे कायम ठेवण्यास नकार दिला होता. यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिच्यावर गोळी झाडून हत्या केली.
दरम्यान, अंजली एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होती. तिच्या हत्येची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. पोलिसांनी युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
प्रेमापायी कर्जबाजारी झालेल्या युवकावर आली नको ती वेळ…
बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…
प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…
प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…
प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…
प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…