
महिला क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या; भावूक सुसाईड नोट…
नागपूर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून अकोल्याच्या एका महिला क्रिकेटपटूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अदिती मोरेश्वर चौखंडे (वय १७) असे या मृत महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने तिच्या भावाच्या नावाने एक भावूक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ज्यामुळे क्रीडा विश्वात आणि परिसरात मोठा हळहळ व्यक्त केली जात आहे.
अदिती मूळची अकोल्याची राहणारी होती. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती गेल्या दोन वर्षांपासून आपल्या आईसोबत नागपुरातील लक्ष्मी नगर भागातील जैन मंदिराजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. येथे ती सर्वे क्रिकेट अकादमीमध्ये कठोर परिश्रम करून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. तिचा भाऊदेखील क्रिकेटपटू आहे. अदितीच्या आईला बुधवारी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास ती स्वयंपाकघरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. आईने तात्काळ मदतीसाठी आरडाओरड केली आणि शेजाऱ्यांच्या मदतीने अदितीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
View this post on Instagram
घटनास्थळी पोहोचलेल्या बजाजनगर पोलिसांना अदितीने तिच्या भावासाठी लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये अदितीने लिहिले होते की, “माझी निवड होऊ शकली नाही, पण तुझी निवड झाली आहे. तू खूप छान खेळ आणि मी आयुष्यभर तुझ्यासोबतच राहीन.” पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदितीचा भाऊ दोन-तीन दिवसांसाठी बाहेर गेला होता. भावाची व्हीसीए (VCA) संघात निवड झाली होती, परंतु अदितीची निवड होऊ शकली नाही. यामुळे ती तीव्र मानसिक तणावाखाली होती.
बजाजनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चेतन चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वर्षभरापूर्वी विवाह! तू काही कामाचा नाहीस, पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…
हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…
अभिनेत्री संचिता उगले हिचे चॅट समोर, आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…
नाशिक! प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…

