समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…

अमरावतीः समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात झाला. ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर […]

अधिक वाचा...

मनोज जरांगे यांचा मोर्चा; पुणे शहरातील मार्ग पुढीलप्रमाणे…

पुणे : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा २० जानेवारीला सुरू झाला आहे. शिरूर वरून हा मोर्चा पुण्याच्या वेशीवर पोहोचला होता. आज (बुधवार) सकाळी दहा वाजता वाघोलीतून दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली आहे. पुण्यात हा मोर्चा धडकणार असून विद्यापीठ चौकातून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, मोर्चामुळे पुणे शहरातील काही […]

अधिक वाचा...

अहमदनगर-कल्याण भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू…

अहमदनगर : अहमदनगर-कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ढवळापूर फाट्याजवळ असलेल्या एसटी बस, इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरमध्ये मंगळवारी (ता. २३) मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको मोटारीमध्ये अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, सहा जणांचा मृत्यू […]

अधिक वाचा...

धक्कादायक! सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवाची वार करून हत्या…

बुलढाणा : संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात सासऱ्याने आपल्या गर्भवती सून आणि नातवाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात ही घटना घडली आहे. नारायण गायकी (वय 65) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. अश्विनी गायकी आणि समर्थ […]

अधिक वाचा...

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड विठ्ठल शेलार याची पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी जिथे लहानाचा मोठा झाला त्याच राहत्या घराच्या परिसरातून त्यांची धिंड काढली. पिंपरीत धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे. शरद मोहोळ हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याचे गाव मुठा गावापासून नऊ […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मुलीच्या नातेवाईकांनी केली वृद्ध वडिलांना बेदम मारहाण; जीव गेला…

सांगली: प्रेम संबंधातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना विजेच्या खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये ही घटना घडली असून, एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दादासाहेब चौगुले […]

अधिक वाचा...

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…

धुळेः पाकिस्तानमधून सहिसलामत परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आर्थिक फसवणूकीबाबत त्यांनी भुसावळ पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानने तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांचा छळ केला होता. भारत सरकारने मोठे प्रयत्न केल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. संपूर्ण […]

अधिक वाचा...

नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…

यवतमाळः नवस फेडायला जाताना बेलगव्हान घाटात झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचाराकरिता मेडीकेअर हॉस्पिटल पुसद येथे तर काहींना नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे. यवतमाळमधील पुसद दिग्रस रोडवरील बेलगव्हान घाटात एक ॲपे (एम एच 29 -31172) पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून, दोघांचा उपचरादरम्यान […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! तलावाजवळ मुलांची कपडे दिसली अन् फुटला हंबरडा…

छत्रपती संभाजीनगर: वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक गुरुवारी (ता. ११) दुपारी घडली आहे. बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय 12), अफरोज जावेद शेख (वय 12), जावेद शेख (वय 14), अबरार जावेद शेख (वय 12) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावे आहेत. यामळे कुटुंबियांवर शोककळा पसरली […]

अधिक वाचा...

माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार…

गोंदिया: माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर आज (गुरुवार) भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. हल्ल्यातील मारेकऱ्यांची ओळख पटली नसून मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे. लोकेश उर्फ कल्लू यादव हे माजी नगरसेवक असून ते अनेक सामाजिक कार्यात सक्रीय आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!