वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
बीड : आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने आज (बुधवार) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले. वाल्मिक कराड हा याआधी जवळपास २१ दिवस पोलीस कोठडीत होता. बीडच्या […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण यांचे आमरण उपोषण; पाहा प्रमुख मागण्या…
धुळे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांनी आजपासून (मंगळवार) धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (जेल रोड) आमरण उपोषण सुरू केले आहे. चंदू चव्हाण म्हणाले, ‘लष्कराची ११ वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले. मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायाची भीक […]
अधिक वाचा...भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…
बीडः बीड-परळी मार्गावर आज (रविवार) पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या युवकांना भरधाव एसटी बसने चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही युवक पोलिस भरतीची तयारी करत होते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बालाजी मोरे, ओम घोडके आणि विराज घोडके अशी मृत युवकांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. बीड परळी महामार्गावर […]
अधिक वाचा...पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…
पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आज (शक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स […]
अधिक वाचा...जामखेडमध्ये बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू; पाहा नावे…
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या जामवाडीत बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चारचाकी वाहनातील 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. विहिरीत वाहन कोसळल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पाण्यात बुडलेल्यांना विहिरीतून वर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चारही जणांचा मृत्यू झाला होता. अशोक विठ्ठल शेळके (वय […]
अधिक वाचा...मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखीच घट्ट झाला आहे. वाल्मिक कराड याला सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयात त्याला आज (मंगळवार) हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. तर, कराडच्या वकिलाने विरोध केला. न्यायालयातील […]
अधिक वाचा...लखोबा लोखंडे! पुणे शहरातील एकाने 25 हून अधिक महिलांची केली फसवणूक अन्…
पुणे: पुण्यातील एका लखोबा लोखंडे याने लग्नाचे आमिष दाखवून 25 हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. संबंधित लखोबा लोखंडेला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फिरोज शेख (वय ३२) असे आरोपीचं नाव आहे. लग्न जमविणाऱ्या एका संकेतस्थळावरून महिला आणि मुलींची माहिती घेत फिरोज शेख त्यांच्याशी संपर्क साधत होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोल्हापूरातील […]
अधिक वाचा...संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे. […]
अधिक वाचा...धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
बीड : मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि देशमुख खून प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, या दोन मागण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…
नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (ता. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री आठ वाजता हा अपघात घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. हे […]
अधिक वाचा...
