
हृदयद्रावक! कॅप्टन सुमित सभरवाल यांना पित्याकडून अखेरचा निरोप; काठी टेकत टेकत…
मुंबई: अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या 171 विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यासह 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुमित सभरवाल यांचे पार्थिव आज त्यांच्या मुंबईतील घरी आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. दिवंगत कॅप्टन सुमित यांना अखेरचा निरोप देताना, त्यांच्या 88 वर्षांच्या वडिलांकडे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
एअर इंडियाच्या AI-171 विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल यांचे वृद्ध वडील आपल्या लेकाचे पार्थिव पाहून गहिरवले. काठी टेकत टेकत मुलाच्या पार्थिवावर पोहोचल्यानंतर, पार्थिव शरीरावर ठेवण्यात आलेला लेकाचा रुबाबदार गणवेशातील हसरा फोटो पाहून डोळ्याच्या कडा पाणावल्या. पुष्कराज यांनी शवपेटीवर अश्रू ढाळतच हातातील काठी बाजूला सरकवत दोन हात जोडून लेकाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
सुमित सभरावाल यांचे पार्थिव आज (मंगळवार) पवईतील त्यांच्या घरी आणल्यानंतर स्थानिकांसह, नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर, चकाला येथील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक व नातेवाईकांनी अंत्यसंस्काराला गर्दी केली होती. आपल्या लेकाच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार घेताना पाहून अनेकांचे मन गहिवरून आले.
दरम्यान, अहमदाबाद येथून लंडनसाठी उड्डाण करणारे एअर इंडियाचे 171 विमान 12 जून रोजी कोसळले. अवघ्या काही मिनिटांत हे विमान खाली कोसळले, या दुर्दैवी घटनेत जवळपास 275 नागरिकांचा मृत्यू झाला असून विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनं कित्येक कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला, अनेकांनी आपले आई-वडिल, मुलगा, सुन, नातवंडे अशी घरातली माणसं गमावली आहेत.
हृदयद्रावक! डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच एअर होस्टेस रोशनीने घेतला जगाचा निरोप…
अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…
हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…
विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…
अहमदाबाद ते लंडन विमानातील कुटुंबाचा सेल्फी ठरला शेवटचा…
अहमदाबाद विमान अपघात! जळालेले मृतदेह अन् पायलटचा शेवटचा मेसेज…
अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रच्या 6 जणांचा मृत्यू; पाहा नावे…
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…
Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…
भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…
Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…
स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

