तुळजापूर ड्रग्ज प्रकरण! आणखी एका भाजप नेत्याला अटक…

धाराशिव: तुळजापूरमध्ये काही दिवसांपूर्वी ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यापासून तब्बल ३८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक राजकीय कनेक्शन समोर आले असून, पोलिसांनी आतापर्यंत भाजपशी संबंधित पाच पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी भाजपच्या माजी नगराध्यक्षाला सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधून अटक केली आहे. संतोष कदम परमेश्वर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो माजी नगराध्यक्ष आहे. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एकूण २२ जणांना अटक केली. यातील सहा आरोपी हे भाजपशी संबंधित आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री नऊ वाजता ही कारवाई केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHWARII💅 (@ishwariii16)

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी भाजपचा माजी नगराध्यक्ष आरोपी विनोद ऊर्फ पिंटू गंगणे यास अटक केली होती. यानंतर पोलिसांनी अटकसत्र अधिक गतिमान केले आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भाजपच्या पाच पुढार्‍यांचा समावेश होता. आता हा सहावा आरोपी देखील भाजपचाच असल्याने ड्रग्ज तस्करीतील राजकीय धागेदोरे समोर येत आहेत. अद्याप १६ जण फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अकलूज येथून रविवारी रात्री नऊ वाजता अटक केली. यानंतर त्यास पुढील तपासासाठी तामलवाडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

तुळजापूर अमली पदार्थ रॅकेट! महिलेकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड…

तुळजापूरमध्ये छेडछाडीला कंटाळून पोलिसकाकाच्या मुलीने संपवलं आयुष्य…

तुळजापूरमधील सरपंचाने स्वत:च रचला होता हल्ल्याचा बनाव; पोलिस तपासात कारण समोर…

तुळजापूरजवळ पुलाखाली एक महिला आणि दोन पुरुषांचे आढळले मृतदेह…

मुख्याध्यापक बापाने नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने मुलीचा घेतला बळी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!