सातारा पोलिसांची मोठी कारवाई; 3 महिलांसह बनावट पोलिसांना ठोकल्या बेड्या…
सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होत असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. सातारा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत पोलिसांची बनावट वेशभूषा करून नागरिकांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत […]
अधिक वाचा...जेजुरीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत ट्रक घुसला; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू…
जेजुरी: पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ असलेल्या भोंगळे मळा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीत एक भरधाव ट्रक घुसला. यावेळी झालेल्या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आषाढी वारीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकने वारकऱ्यांना उडवले तो ट्रक वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा होता. […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी शिकवला वारकऱ्यांच्या वेशातील चोरट्यांना धडा…
पुणे: श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरी करणाऱ्यांना पोलिसांना धडा शिकवला आहे. चोरट्यांना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, मंगळसूत्रे आणि महागडे मोबाईल लंपास करण्याचा सपाटा लावला होता. याविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८९ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वेगवेगळ्या ठिकाणी […]
अधिक वाचा...श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल…
पुणे : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 8 जुलैला श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात 11 ते 15 जुलैदरम्यान कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत संबंधित मार्गांवरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. […]
अधिक वाचा...‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील ८ हजार पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप…
पुणे (संदिप कद्रे): पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये ६ हजार पुरुष तर २ हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलिस बांधवाची गैरसोय टळणार आहे आणि परिणामी […]
अधिक वाचा...
