
राजगडाच्या बालेकिल्ल्यावरुन कोसळून पुण्यातील विवाहित महिलेचा जागीच मृत्यू…
पुणेः राजगड किल्ल्यावर असलेल्या अतिदुर्गम बालेकिल्ल्यावरून सुमारे 400 फूट खाली कोसळल्यामुळे पुण्यातील 21 वर्षीय पर्यटक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. कोमल शिंदे (वय 21 वर्ष, रा. आळंदी, पुणे) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
शिंदे दाम्पत्य राजगडावर फिरायला आले असताना ही दुर्घटना घडली. कोमल या पतीसोबत राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेल्या असताना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कोमल शिंदे या बालेकिल्ल्याच्या अति बिकट वाटेवरुन 400 फूट खाली कोसळल्या. संजीवनी आणि सुवेळा माचीच्या पायवाटेवर असणाऱ्या कड्याच्या खडकावर आपटून त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर जखमा झाल्या होत्या. रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह रेस्क्यू पथकाने गडावर धाव घेत रात्री उशिरा कोमल यांचा मृतदेह गडावरून खाली आणला.
दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.
पुणे! हिंजवडीत IT इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन मारली उडी…
कोल्हापूर हादरलं! लिव्ह इन हत्याकांडाचा झाला थरारक शेवट…
हृदयद्रावक! स्नेहसंमेलनामध्ये गाणं म्हणत असतानाच सर कोसळले अन्…
कोल्हापूर! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीला तडफडून मारलं…
धुळे! जवानाने केली पत्नीची निर्घृण हत्या…

