मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गावर 3000 रुपयांचा Fastag चालणार का? घ्या जाणून…

मुंबई: केंद्र सरकारने फास्ट टॅगबद्दल मोठी घोषणा केली. वर्षाला 3000 रुपयांचा पास काढता येणार असून, या पासवर 200 टोलवरून प्रवास करता येणार आहे. पण, ते कोणते टोल असतील किंवा हा कुठे चालेला, हा पास कुठून घ्यायचा असे अनेक प्रश्न वाहनचालकांना पडले आहेत.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी फास्टटॅग पासबाबत मोठी घोषणा केली. 3000 रुपयांचा वर्षाला पास काढता येणार आहे. ही सुविधा 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. तुम्हाला ऑनलाईन पाससाठी अर्ज करता येणार आहे. पण, हा पास फक्त केंद्र सरकारच्या अख्यारित असलेल्या टोलसाठी लागू करण्यात आला आहे. खासगी किंवा दुसऱ्या कंपनीला दिलेल्या टोलप्लाझासाठी हा पास वापरता येणार नाही तिथे टोल भरावा लागणार आहे.

तीन हजार रुपयांचा वर्षाला पास काढल्यानंतर देशभरातील टोल प्लाझावरील गर्दी कमी होण्यासही मदत होईल. सतत रिचार्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल. पण, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर हा पास चालणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत.

तीन हजार रुपयांचा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्र सरकारच्या अख्यारित असलेल्या एक्सप्रेस वेवर चालणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर हा पास व्हॅलिड नसेल. समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देखील हा पास व्हॅलिड राहणार नाही. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे, मात्र त्यांच्यासाठी हा पास व्हॅलिड नसेल. शिवाय, राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या खासगी किंवा दुसऱ्या कंपनीला दिलेल्या टोलप्लाझासाठी हा पास लागू होणार नाही.

मोठी बातमी! एकच पास काढा आणि वर्षभर देशभरात टोल न भरता फिरा…

Fastag चा बदलला नियम; तर भरावा लागेल दुप्पट टोल…

FASTag नवीन नियम लागू; दंड टाळण्यासाठी काय करावे? घ्या जाणून…

Fastag चा बदलला नियम; तर भरावा लागेल दुप्पट टोल…

राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…

जेसीबी वाहनावर अवैध कारवाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस…

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? घ्या जाणून…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!