प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह…
मुंबई : प्रसिद्ध मल्याळम टेलिव्हिजन अभिनेत्री अपर्णा नायर (वय ३१) हिचा धक्कादायक अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अपर्णा तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेत्री अपर्णा तिच्या थलीयिल, करमाना येथील घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. प्रथमदर्शी तिने आत्महत्या केल्याचं दिसून आले आहे. अभिनेत्री अपर्णा नायरच्या झालेल्या धक्कादायक मृत्यूने तिच्या […]
अधिक वाचा...उद्धव ठाकरे यांच्या खंद्या शिलेदाराने रुळावर झोपून संपवलं आयुष्य…
मुंबई : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले असून, त्यांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सुधीर मोरे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर गुरुवारी […]
अधिक वाचा...वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द अन्…
पुणे: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर लायसन्स थेट तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा साडेसहाशेहून अधिक लायसन्स रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव दिले असून, त्यातील 195 लायसेन्स रद्द झाले आहेत. यामुळे संबंधित चालकांना लायसन्ससाठी नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. कारवाई झालेल्या चालकाने नव्याने लायसन्स न काढता वाहन चालवल्यास दहा हजार रुपयांचा दंड […]
अधिक वाचा...Video: ‘मुळशी पॅटर्न’चा थरारानंतर पोलिसांनी काढली गुंडांची धिंड…
नाशिक : ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या कथानकानुसार जीवे मारण्याची धमकी देऊन जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून 13 आरोपी फरार आहेत. या गुंडाची दहशत कमी करण्यासाठी त्याच परिसरातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पिस्तूलाचा धाक […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…
पुणे : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला रस्त्यातच मृत्यूने गाठल्याची हृदयद्रावक घटना पुणे-पानशेत रस्त्यावर घडली आहे. संस्कृती प्रदीप पवार (वय १२) असे मृत बहिणीचे नाव आहे. ती पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड सीटीजवळ राहत होती. पुणे शहरातील नांदेड सीटी परिसरात राहणारे प्रदीप पवार हे रक्षाबंधन सोहळ्यासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती आणि बहीण सुनीता […]
अधिक वाचा...रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाची अवस्था पाहून बहिणीने फोडला हंबरडा…
औरंगाबाद : रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने आपल्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बलुजा भागातील बजाजनगरात परिसरात घडली आहे. आकाश सर्जेराव शिंदे (वय 30, रा. खैरका, ता. मुखेड, जि नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एका कंपनीत काम करत होता. दरम्यान तो औरंगाबाद येथे बहिणीच्याच घरी वास्तव्यास होता. तर, त्याची […]
अधिक वाचा...शिक्षकाने बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला? असे विचारले अन्…
पुणे: विद्येच्या माहेरघरात शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील लोहगाव परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षकानेच शाळेतील दोन विद्यार्थ्याींनीसोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथे केंद्रीय विद्यालय आहे. आरोपी शिक्षक हा […]
अधिक वाचा...मच्छिमाराला रात्रीच्यावेळी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला अन्…
पनवेल : एक युवती मोबाईल जास्त वेळ वापरते म्हणून कुटुंबिय ओरडले होते. घर सोडून गेलेल्या युवतीने समुद्रात उडी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रियंका तांडेल (वय 20, रा. कासारभाट, ता. पनवेल) असे मृत युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका जास्त वेळ मोबाईल वापरते म्हणून घरातील […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…
लातूर: एका अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदुर्गा (ता. औसा) गावात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुर्गा गावातील एका दहा वर्षीय मुलगी दररोज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिकवणीला जात असते. मुकेश अंबाजी […]
अधिक वाचा...लग्न जमवत नसल्याने मुलाने घेतला अपंग वडिलांचा जीव…
पंढरपूर: लग्न जमवत नसल्याने एका मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिरसरात खळबळ उडाली आहे. गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय 28, रा. भगवान नगर, पंढरपूर) असे मुलाचे तर हुकुम माणीक कदम (वय 58) असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. मुलाने रागाच्या भरात पित्याच्या डोक्यात […]
अधिक वाचा...
