IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…
लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेश पोलिस दलात तैणात असणाऱ्या महिला पोलिस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकुर यांची एकाने फसवणूक केली आहे. श्रेष्ठा ठाकुर यांनी गाजियाबादच्या कौशांबी स्थानकात पूर्वाश्रमीचा पतीविरोधात तक्रार दाखल केली. शिवाय, लग्नानंतर त्याची खरी माहिती उघड झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. कानपूरच्या रहिवासी असलेल्या श्रेष्ठा ठाकुर या सध्या उत्तर प्रदेश पोलिसात उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याने धावत्या वाहनातून उडी घेत वाचवला युवकाचा जीव…
जळगाव : भुसावळ शहरात एका युवकाच्या डोक्यात पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून फरशीने हल्ला होत असतानाच पोलिस अधिकाऱ्याने धावत्या वाहनातून उडी घेतली आणि युवकाचा प्राण वाचवला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या कामगिरीमुळे त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे. भुसावळ शहरात एका युवकाला बेदम मारहाण करत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. या टोळक्याकडून […]
अधिक वाचा...पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खून; आईच्या हत्येनंतर मुलगा…
पुणे : पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. औंधमध्ये शनिवारी (ता. १०) एकाने सहकाऱ्यावर गोळीबार करत आत्महत्या केली. बुधवार पेठेत शुक्रवारी (ता. ९) एकाने वस्ताऱ्याने व्यक्तीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर आज (रविवार) सकाळी मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना खडकी भागात असलेल्या रेंज हिल परिसरात घडली आहे. गुंभाबाई शंकर […]
अधिक वाचा...Video: नाशिकमध्ये ३४व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप!
नाशिक : महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील सर्वोत्तम पोलिस दल असून, पोलिस दलाचा इतिहास गौरवशाली आहे. एखाद्या पोलिसाकडून चुकीचे कृत्य घडले तर पोलिस दलाला टीकेला सामोरे जावे लागते. पोलिसांनी अशावेळी आपली शपथ निभवण्यासाठी आपले पोलिस दल समाजभिमुख कसे होईल, यासाठी योगदान द्यावे. शासक नव्हे तर जनसेवक म्हणून पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन राज्याचे […]
अधिक वाचा...अहमदनगरच्या व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला; गावठी कट्टा सापडला…
अहमदनगर: अहमदनगर शहरातील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी (वय 53) यांच्यावर गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर कॉलनीत प्राणघातक हल्ला झाला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी तलवार यासारख्या हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला आहे. तसेच, घटनास्थळी एक गावठी कट्टा देखील मिळून आला आहे. व्यापाऱ्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करत असतांना झटापटीत पिस्तुल खाली पडली. […]
अधिक वाचा...शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लिलाकर असे आरोपीचे नाव असून त्याला सायबर गुन्ह्यात अटक केली होती. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला त्याने धमकी दिली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट […]
अधिक वाचा...पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना मोठा दणका…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करीत फिरणाऱ्या बुलेटस्वारांना शहर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. दोन दिवसांत तब्बल 571 बुलेटवर कारवाई करून सायलेन्सर जप्त करण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली असून जप्त केलेल्या सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांनी बुलडोझर चालविला. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला केले गजाआड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिस ठाणे हद्दीत दरोडा घालण्याचे प्रयत्नात असलेल्या चार आरोपींना गजाआड करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, मुंढवा पोलिस ठाणे यांनी ०७/०२/२०२४ रोजी २१/१५ वा. मुंढवा पोलिस ठाणे कडील रात्रगस्त अधिकारी सहा. […]
अधिक वाचा...परदेशातील कामाच्या बनावट वर्क ऑर्डर; व्हिसा देणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर वगैरे कामाच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून तसेच ब्रुनेई देशाचा बनावट व्हिसा देवून फसवणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांना, भुमकर चौक, वाकड भागात बनावट व्हीसा बनवून, परदेशात नोकरी लावून देऊ असे सांगुन नागरीकांची फसवणुक करणारे कार्यालय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तक्रारदार मनिष […]
अधिक वाचा...पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल…
पुणे : पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 43 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता निर्भया बनो या कार्यक्रमाच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल वागळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भया बनो या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या गदारोळानंतर किमान 200 ते 250 जणांवर गुन्ह्याची नोंद […]
अधिक वाचा...
