
Video: पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…
पुणेः पुणे शहरतील दत्तवाडी परिसरात बुधवारी (ता. १४) भरदिवसा एका युवकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या थरारक फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com
दत्तवाडी परिसरात बुधवारी दुपारी कोयता गँगने एका युवकाचा पाठलाग करत त्याच्यावर हल्ला चढवला. कोयत्याने अनेक वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे दत्तवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, युवकावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी दत्तवाडी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…https://t.co/42LUDp6Iqz#Pune #PuneCrime @PunePolice pic.twitter.com/GeY6gWIGmm
— policekaka News (@policekaka) May 15, 2025
गुंड गजा मारणे मटण पार्टी प्रकरणी मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणे जिल्हा हादरला! नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग…
पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घालत केली वाहनांची तोडफोड…
पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…
पुणे शहरात कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video Viral…
Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

