पोलिस अधिकाऱ्याने धावत्या वाहनातून उडी घेत वाचवला युवकाचा जीव…

जळगाव : भुसावळ शहरात एका युवकाच्या डोक्यात पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून फरशीने हल्ला होत असतानाच पोलिस अधिकाऱ्याने धावत्या वाहनातून उडी घेतली आणि युवकाचा प्राण वाचवला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या कामगिरीमुळे त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

भुसावळ शहरात एका युवकाला बेदम मारहाण करत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. या टोळक्याकडून युवकाच्या डोक्यात फरशीने हल्ला करण्यात येणार होता. मात्र, त्याचदरम्यान पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी धावत्या वाहनातून उडी घेत युवकाचे प्राण वाचवले आहेत.

पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे हे कार्यालयातून घराकडे जात असताना जामनेर रोडवर होत असलेली हाणामारी पाहून त्यांनी थेट आरोपींवर धावत्या वाहनातून उडी घेत त्यांच्या हातातील फरशी हिसकावून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित युवकाचा जाब घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Video: खाकी वर्दीतला देव चिमुकलीच्या मदतीला धावला…

खाकी वर्दीचे आपलेपण जपणारे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके…

जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!

तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!