
पुणे बॉम्ब प्रकरण! आरोपीचा ‘क्लीन शेव्ह’चा फंडा अन् उपचारासाठी…
पुणे : पुणे शहरातील हडपसर येथील रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या शिवाजी राठोड याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. अटक टाळण्यासाठी आणि ओळख पटू नये यासाठी शिवाजी राठोड याने वेगळीच शक्कल लढवली. त्याने गुन्ह्याच्या दिवशीच आपला संपूर्ण ‘लुक’ बदलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शिवाजी राठोड याला दाढी वाढवण्याची आवड होती. मात्र, बुधवारी (ता. १३ मे) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवण्याच्या काही वेळ आधी तो मांजरी बुद्रुक येथील एका सलूनमध्ये गेला. तिथे त्याने आपली पूर्ण दाढी आणि मिशा काढून घेतल्या. “माझ्याकडे आता पैसे नाहीत, नंतर देतो, मला दवाखान्यात जायचे आहे,” असे सांगून तो तिथून बाहेर पडला होता.
View this post on Instagram
शिवाजी राठोड गेल्या तीन महिन्यांपासून मांजरीतील धावटे वस्ती परिसरात ‘द रिअल कलेक्शन’ नावाचे दुकान चालवत होता. चष्मे, पट्टे आणि कपडे विक्रीचा त्याचा व्यवसाय होता. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्याने गेल्या तीन महिन्यांपासून दुकानाचे भाडे दिले नव्हते, परिणामी दुकानमालकाने चार दिवसांपूर्वीच त्याच्या दुकानाला कुलूप ठोकले होते. याच दुकानातील व्यवहारातून आणि ऑनलाईन लिंकवरून पोलिसांना त्याचे महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.
पुणे पोलिसांनी शिवाजी राठोड याचा माग काढल्यानंतर तो शहराबाहेर पळाल्याचे स्पष्ट झाले. अखेर ‘एटीएस’च्या (ATS) मदतीने त्याला नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. लुक बदलून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा त्याचा प्रयत्न तांत्रिक तपासामुळे फसला आहे.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीला रुग्णालयातून उपचार घेण्यासाठी सात लाख रूपयांचा अंदाज देण्यात आला होता . मात्र ते पैसे नसल्याने डॉक्टरकडूनच पैसे उकळण्यासाठी बॉम्ब सदृश्य वस्तू ठेऊन खंडणी मागण्याचा त्याचा प्रयत्न होता. या सगळ्या प्रकरणात तो अडकला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
View this post on Instagram
पुणे! हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठा खुलासा! तो बॉम्ब नव्हताच तर…
मोठी बातमी! पुणे बॉम्ब प्रकरणी आरोपीला नागूपरमध्ये ठोकल्या बेड्या…
पुणे बॉम्ब स्फोटातील जामिनावरील आरोपीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या…
पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…
पुणे शहरात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याबरोबरच बॉम्ब स्फोटची धमकी…
पुणे! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने केला खून; आरोपी जेरबंद…

