
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. दोघांच्या अटकेनंतर संतोष देशमुख खून प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी सुदर्शन घुले आसरा घेण्यासाठी भिवंडीत आला होता. पण त्याला आसरा न मिळाल्याने त्याने थेट गुजरातला पलायन केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले हा आपल्या दोन साथीदारांसह आसरा मागण्यासाठी 11 डिसेंबरला भिवंडीत आला होता. त्याला मूळचे बीडचे रहिवासी असलेल्या विक्रम डोईफोडे यांच्याकडे आसरा पाहिजे होता. डोईफोडे हे भिवंडीत अनेक वर्षापासून स्थायिक आहेत. तसेच बीड जिल्ह्यात समाज कल्याण न्यास मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे समाज कल्याण न्यासाकडून काही मदत मिळते का? याची चाचपणी घुले याने केली होती.
सुदर्शन घुले याने पहिल्यांदा अंजुर फाटा येथील समाज कल्याण न्यासचे कार्यालय गाठले. समाज कल्याणच्या कार्यालयात जयवंत पाटील यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर त्याने विक्रम डोईफोडे यांच्या संदर्भात विचारणा केली. मात्र, विक्रम डोईफोडे शहराबाहेर असल्याचे जयवंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सुदर्शन घुले विक्रम डोईफोडे यांच्या वळपाडा येथील हॉटेलवर गेला. तिथे त्याने आसरा मागितला. पण इथे त्याला आसरा मिळाला नाही.
वळपाडा येथील डोईफोडे यांच्या हॉटेलवर आसरा न मिळाल्याने लघवीला जातो असे सांगून सुदर्शन घुले याने तिथून पलायन केले. त्यानंतर तिघेही गुजरातला गेले. गुजरातमध्ये एका मंदिरात त्यांनी जळपास 15 दिवस आसरा घेतला होता. आरोपी सुदर्शन घुले याने आपली ओळख लपवण्यासाठी मिशी कापल्याची देखील माहिती समोर आली आहे. भिवंडीत आल्यानंतर त्याने मिशी कापली होती. याबाबतचा फोटो देखील समोर आला आहे.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना अटक झाल्यानंतर केज न्यायालयात हजर केले गेले. यानंतर केज न्यायालयाने या तिघांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नेकनूर पोलिस ठाण्यात तिघांची चौकशी झाल्यानंतर माजलगाव शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत या तिघांची रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी गेवराई पोलिस ठाण्यात आहेत. तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

