Video: मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी; पाहा जखमींची नावे…

मुंबई : मुंबईत वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली असून, यात ९ प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. संबंधित घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना आज (रविवार) सकाळी सहा वाजता वाजता घडली. वांद्रे टर्मिसवरून पहाटे गोरखपूरला जाणारी रेल्वे लागते. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित असते. म्हणूनच या रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रवाशी गर्दी करतात. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाणारे प्रवासी या रेल्वेतून प्रवास करतात. दिवाळी आणि छट पूजा हे सण उत्तरेतील राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हे सण कुटुंबासोबत साजरे करावेत म्हणून मुंबईत कामाला आलेले उत्तर भारतीय या सणानिमित्त आपापल्या गावी जातात. गोरखपूरला जाणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी प्रवासी वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर आले होते. मात्र ही रेल्वे उभी असलेल्या प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाली.

गोरखपूरला जाणाऱ्या या रेल्वेत बसण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. यावेळीच चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे चेंगराचेंगरीची ही घटना इतकी गंभीर होती, की जखमी झालेले प्रवाशांची स्थिती फारच हृदयद्रावक झाली आहे. जखमी झालेल्या प्रवाशांमधील एकाची तर थेट मांडी फाटली आहे. आणखी एका प्रवाशाचा हात तुटला आहे. चेंगराचेंगरीत काही प्रवाशांचे कपडेही फाटले आहेत. चेंगराचेंगरी इतकी भीषण होती प्लॅटफॉर्मवर रक्त सांडलेले दिसत आहे. प्लॅटफॉर्मवरील रेल्वे ट्रॅकवर चपलांचा खच पडल्याचा दिसत होता.

घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे…
शबीर अब्दुल रेहमान
परमेश्वर गुप्ता
रविंद्र छुमा
रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजापती
संजय कांगाय
दिव्यांशू यादव
मोहम्मद शेख
इंद्रजित शहानी
नूर शेख

मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर पोलिसांची चाणाक्ष नजर गेली एका बॅगवर अन्…

हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…

सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करुन गेले वांद्रे रेल्वे स्टेशनवर; ओळख पटली…

हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!