अल्पवयीन मुलाचा बळी द्यावा लागेल, असे मांत्रिकाने सांगितले अन् केले तीन तुकडे…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या पुतण्याचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना प्रयागराज येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी काकाला अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीने हत्येची कबुली दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सरन सिंह असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीयूष (वय १७) असे हत्या झालेल्या पुतण्याचे नाव आहे. आरोपी सरन सिंह याने तांत्रिकाच्या सांगण्यावरून पुतण्याच्या शरिराचे तीन तुकडे केले आहेत. आरोपी सरन सिंह यांच्या एका मुलाने आणि मुलीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. दोन्ही मुलांनी अशाप्रकारे जीवन संपवल्याने सरन सिंहला धक्का बसला होता. दरम्यान, तो एका मांत्रिकाच्या संपर्कात आला. यावेळी मांत्रिकाने सरन सिंह याला गृहदोष असल्याचे सांगितले. हा गृहदोष दूर करायचा असेल तर तुझा मुला-मुलीच्या वयाच्या एका अल्पवयीन मुलाचा बळी द्यावा लागेल, असे मांत्रिकाने सांगितले. मांत्रिकाच्या सांगण्यावरून चुलता सरन सिंह याने आपला पुतण्या पीयूषचा बळी देण्याचा कट रचला होता.

सदियापूर गुरुद्वाराजवळ राहणारा पीयूष हा ११वीत शिकत होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे करेली सरस्वती शिशु मंदिरात जाण्यासाठी घरातून निघाला. पण, संध्याकाळपर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तपास सुरू झाल्यावर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी, एका महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने एका व्यक्तीला नाल्यात एक मृतदेह फेकताना पाहिले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुन्हा तपास केला आणि सीसीटीव्हीमध्ये पीयूषचा चुलता सरन सिंह संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली आणि चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने पोलिसांना सांगितले की, सोमवारी पीयूष शाळेत जात असताना त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला आपल्या घरी आणून तांत्रिक पूजा करून त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याने पीयूषच्या शरीराचे तीन तुकडे केले. हात आणि पाय करेहंदाच्या जंगलात फेकले, तर धड नाल्यात फेकून दिले. पोलिसांनी मृतदेह आणि शरीराचे तुकडे ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

Viral News! शिक्षकाचं बेपत्ता झालेलं अख्ख कुटुंब सापडलं…

नवविवाहित सुनेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् काही वेळातचं संपवलं…

पुणे! गौतमची पाच दिवस मृत्यूशी झुंज; कुत्र्यावर दया अन् केसं-दाढी…

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला पैशांसाठी पत्नी-मुलांकडून बेदम मारहाण…

लातूर! सुटकेसमध्ये मृतावस्थेत आढळला युवतीचा मृतदेह…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!