
वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
पुणेः पुणे शहरातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 22 आरोपींना अटक केली असून, सर्वच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 22 आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर (वय 40) यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, या आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
सहा ते सात टू व्हीलरवरुन तेरा ते चौदा जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर १ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास गोळीबार करत कोयत्याने वार केले. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती. शिवाय आंदेकर एकटेच असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केला. घरात कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तेरा ते चौदा जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर कोयत्यानं वारही केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. त्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
मोक्का कधी लावला जातो…
गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसेच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
मोक्का लागल्यावर शिक्षा काय असते…
मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही शिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे. संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली आहे.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…
पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…
पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…
पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

