
पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी पंकज देशमुख…
पुणे : पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व आनंद भोईटे या दोघांचीही पोलिस उपायुक्त बृह्नमुंबई येथे बदली करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक असलेले पंकज देशमुख आता पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आहेत. नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे अतिरिकत् नियंत्रक संजय जाधव बारामती विभागाचे नवीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. चाळीसगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारतील.
पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या धडाकेबाज कामगिरीचा आढावा…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची एक वर्षात ऐतिहासिक कामगिरी…
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
राज्यात 17471 पोलिसांची होणार भरती…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

