केगांव येथील चार आरोपींना ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : केगांव येथे अंगणात कुंपणाचे ताट्या बांधत असतांना एकाच कुटुंबात झालेल्या वादात आरोपी गजानन टोंगे, विनोद टोंगे, प्रमोद टोंगे व परशुराम टोंगे या ४ आरोपींना भादंवि कलम ३०७ अंतर्गत केळापूर येथील न्यायाधीश २ व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी ७ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ₹ २००० दंड ठोठावला आहे.

शासनाकडून सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रकाश मानकर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. तर आरोपी गजानन टोंगे व इतर आरोपींची बाजू ॲड. गणेश धात्रक, ॲड. निलेश शक्ला यांनी मांडली.

केगांव येथे कुंपणाचे ताट्या बांधत असतांना झालेल्या वादात गजानन लटारी टोंगे, विनोद गजानन टोंगे, प्रमोद गजानन टोंगे व परशुराम लटारी टोंगे यांनी कु-हाड, काठ्या, सुरी या धारदार शस्त्राच्या केलेल्या हल्यात बालकृष्ण बबन टोंगे, बबन लटारी टोंगे हे गंभीर जखमी झाले होते. सदर प्रकरणाची तक्रार मारेगांव पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यावरुन मारेगांव पोलिस ठाण्यात ४ आरोपी विरुद्ध भादंवी कलम ३०७ सह कलम ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरणाचा मारेगांव पोलिसांनी तपास करून केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

सदर प्रकरणात भादंवि कलम ३०७ अंतर्गत आरोपी गजानन टोंगे, विनोद टोंगे, प्रमोद टोंगे व परशुराम टोंगे यांना प्रत्येकी ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ₹ २००० दंड ठोठावण्यात आला. दंडा पैकी ₹ ६००० जखमी बाळकृष्ण टोंगे व बबन टोंगे यांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायाधीश २ व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी दिले आहे. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी अधिवक्ता ॲड. प्रकाश मानकर यांनी न्यायालयात मांडली.

होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी खावी लागते शिळी…

सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…

खोक्याचे घर जाळलं; प्राण्यांचा मृत्यू तर कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप…

प्रेमसंबंध! नाशिकमध्ये महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीतील नावे पाहा…

भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा महत्त्वाचे नियम…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!