अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…

चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री सौम्या शेट्टी हिच्यावर चोरीचा आरोप असून, पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशाखापट्टणम पोलिसांनी तिच्या ताब्यातून एक किलो सोनं ताब्यात घेतले आहे. सौम्या शेट्टी हिने मैत्रिणीच्याच घरी चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रसाद नावाच्या एका व्यक्तीच्या घरी चोरी झाली. ही व्यक्ती भारतीय डाक विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. घरी चोरी झाल्याचं कळताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या घरातून सोन्याच्या मौल्यवान वस्तू चोरी झाल्या होत्या. अभिनेत्री सौम्या ही प्रसाद यांच्या मुलीची मैत्रीण आहे. दोघी एका चित्रपटाच्या ऑडिशन दरम्यान भेटल्या होत्या. प्रसाद यांच्याकडे महागड्या वस्तू आणि दागिने असल्याचे तिला कळल्यानंतर ती सतत त्यांच्या घरी येत जात होती. प्रसाद यांच्या घरात कार्यक्रमानिमित्त कुटुंबीय तयार होत होते तेव्हा त्यांना घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे समजले.

सौम्यानं प्रसाद यांच्या घरातून एक किलो सोनं चोरी केले होते. चोरी करुन सौम्या गोव्याला रवाना झाली होती. सौम्या गोव्यात असल्याची माहिती मिळताच विशाखापट्टणम पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सध्या सौम्या शेट्टी विझाग गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे. सौम्या ही तेलुगू फिल्म इंडस्ट्रीची नवोदित अभिनेत्री आहे.

अभिनेत्री जया प्रदा पोलिसांसमोर अचानक राहिल्या हजर…

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…

अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…

हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!