
हृदयद्रावक! शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; वडिलांचा आक्रोश…
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे (रा. काळेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता.
दहाच्या सुमारास सार्थक तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. खेळत असताना तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. सार्थक याला शाळेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. पण, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. सार्थक याला मित्रांनी दिलेला सल्ला ऐकला असता तर ही दुर्देवी घटना घडली नसती. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घडलेल्या घटनेची पालिकेकडून चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आल्याची माहिती, पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
सार्थकला याच वर्षी पिंपरीतील शाळेत शिक्षणासाठी घातले होते. यापूर्वी तो काळेवाडीतील शाळेत शिकायचा. माझा मुलगा मला आहे तसा परत ज्या, असा आक्रोश सार्थकच्या वडिलांनी केला आहे. ते म्हणाले, माझा मुलगा सकाळी मला सांगून शाळेत आला. शाळेत येताना काळजी घ्या आणि नीट कामावर जा, असे तो म्हणाला. मात्र काही वेळातच मला फोन आला आणि दवाखान्यात यायला सांगितले. सार्थकला दुखापत झाल्याचे सांगितले. मात्र सार्थकचा मृत्यू झाला होता. शाळेवर कठोर कारवाई करा आणि माझा मुलगा जसा सकाळी शाळेत आला होता तसाच परत करा, अशी मागणी वडिलांनी केली आहे.
हृदयद्रावक! तलावाजवळ मुलांची कपडे दिसली अन् फुटला हंबरडा…
हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू…
हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

