हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…

छत्रपती संभाजीनगर: पैठणहून दुचाकीने घरी येत असताना समोरून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात आईसमोरच लेकराने जीव सोडला तर आई गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दावरवाडी परिसरात असलेल्या पाचोड-पैठण रस्त्यावर ही घटना घडली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

समाधान सिताराम दांडगे असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव तर आई सुशीलाबाई सिताराम दांडगे असे गंभीर जखमी झालेल्या मातेचे नाव आहे. समाधान दांडगे त्यांची आई सुशीलाबाई दांडगे हे माय-लेक सोमवारी (ता. १८) सकाळी कडेठाण येथून आपले शेतीचे पीएम किमान योजनेची पैसे येत नसल्याने पैठण येथील तहसील कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. तेथील काम आटोपून सायंकाळी हे दोघेजण आपल्या गावी कडेठाण येथे जात होते. ते दोघे पाचोड-पैठण दावरवाडी शिवारात येताच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात समाधान दांडगे याला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला तर त्याची आई सुशीलाबाई दांडगे या गंभीर जखमी झाल्या आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू…

नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दहा ठार; संपूर्ण कुटुंबच संपलं…

हृदयद्रावक! दीड वर्षांची चिमुकली अन् सहा महिन्यांची गर्भवती…

हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!