हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…

मुंबई : कर्तव्यावरून आपल्या घरी जात असताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलिसकाकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सांताक्रुज पूर्व परिसरात घडली आहे. समीर सुरेश जाधव (वय 37) मृत पोलिसाचे नाव आहे. त्यांच्या मृत्युमुळे पोलिसदलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समीर सुरेश जाधव हे दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. रविवारी (ता. २४) दुपारी ते साडेतीन वाजता कर्तव्यावरून आपल्या घरी वरळी येथील निवासस्थानी दुचाकीने परतत होते. वाकोला ब्रीज, सांताक्रुज पूर्व परिसरात मांजाने त्यांचा गळा चिरला. त्यांना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र जाधव यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, दरवर्षी नायलॉनच्या मांजामुळे राज्यात शेकडो अपघात घडत असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जाधव देखील मांजाचे बळी ठरले आहेत.

kashmir
kashmir

पोलिसकाकाचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; ‘बोला प्रभू’ आवाज हरपला…

पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…

पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वत:वरच झाडून घेतली गोळी…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!