
शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित ससूनमधून पळून गेलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकी दिल्याचा आरोप असलेला मार्शल लुईस लिलाकर याला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले असताना तो पळून गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या आरोपीच्या पुन्हा एकदा मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपी मार्शल लुईस लिलाकर याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी नेरळ व कर्जत येथे तपास पथके रवाना केली होती. दरम्यान आरोपी हा येरवडा येथील त्याच्या मावशीच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना मार्शल लुईसने धमकावले होते. या प्रकरणी लिलाकर याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले होते. त्यावेळी तो पोलिसांच्या तावडीतून निसटून पळून गेला होता.
दरम्यान, मार्शल लुईस लिलाकर पळून गेल्यानंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान, गुंड शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी न्यायालयात पुरवणी जबाबात आपल्याला धमकावले जात असून हत्येचे सूत्रधार मारणे आणि शेलार यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. अखेर पोलिसांनी मार्शल लुईस लिलाकर याला त्याच्या मावशीच्या घरातून तब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…
ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या…
गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीचा जीवाला धोका असल्याचा दावा; कोणापासून पाहा…
थरार! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले…
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

