कोंढवा पोलिसांना नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसला अन् गुन्हे केले उघड…

पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करताना यमाहा कंपनीच्या दुचाकीचा मागील व पुढील बाजुस असलेल्या नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसून आला.  दुचाकीसह त्याला पोलिस स्टेशनला आणल्यानंतर चोरीच्या गुन्ह्यासह एकूण आठ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलिस ठाणेस वाढत्या प्रमाणात दाखल होणा-या वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध होण्याचे अनुषंगाने कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत १२/१२/२०२३ रोजी सायं. १८/०० वा. चे सुमारास पो. अंम / १०११६ भोसले व पो. अंम / ९८३८ बनसुडे हे कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत होते. आंबेकर हॉटेल चौक पिसोळी येथे एक जण निळ्या रंगाच्या यमाहा कंपनीच्या दुचाकी वाहनावर बसलेला दिसुन आला. सदर वाहनाचे मागील व पुढील बाजुस असलेल्या नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसून आल्याने त्याच्याकडे सदर वाहनाचे कागदपत्राबाबत व लायसन्सबाबत विचारणा केली. तेव्हा तो त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागल्याने, त्यांनी त्यास गाडीसह कोंढवा पोलिस स्टेशन येथे आणले. त्यावेळी त्याने सदरचे वाहन हे चोरी करुन आणल्याचे सांगितले.

सदरबाबत त्यांनी अभिलेख तपासले असता, त्याच्याकडे मिळुन आलेले वाहन हे कोंढवा पोलिस स्टेशन गुरनं. ११९६ / २०२३ भादवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेले वाहन असल्याचे निष्पन्न झाले. सोहेल मन्सुर पोटोदे (वय १९, धंदा गॅरेजकाम, रा. संभाजी बारणे यांचे ऑफिसचे मागे शिवतीर्थनगर, थेरगाव, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यात असलेली गाडी जप्त करुन त्यास कोंढवा पोलिस स्टेशन येथे घेवून आले. पोलिस स्टेशन येथे आणून त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे तपास करता त्याने त्याचा साथीदार विधीसंघर्षीत बालकाचे सोबतीने आणखी पाच दुचाकी चोरल्याचे निष्पन्न करुन ६ दुचाकी जप्त केल्या.
१. कोंढवा पोलिस स्टेशन गुरनं. ११९६ / २०२३ भादवि कलम ३७९,
२. कोंढवा पोलिस स्टेशन येथे गुरनं. १८०/२०२३ भादवि कलम ३७९,
३. कोंढवा पोलिस स्टेशन येथे गुरनं. ७५६/२०२३ भादवि कलम ३७९,
४. कोंढवा पोलिस स्टेशन येथे गुरनं. ७९७ / २०२३ भादवि कलम ३७९,
५. कोंढवा पोलिस स्टेशन येथे गुरनं. ७५१ / २०२३ भादवि कलम ३७९ व
६. लष्कर पोलिस स्टेशन येथे गुरनं. ९४ / २०२३ भादवि कलम ३७९ असे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले.

शिवाय, १३/१२/२०२३ रोजी रात्री दहाच्या सुमारास कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना खडीमशीन चौक जवळ एक जण काळ्या रंगाच्या दुचाकी वाहनावर बसलेला दिसुन आला. त्यास हटकले असता तो तेथून गाडी सोडुन पळून जावू लागला. तेव्हा आम्ही आमचे सोबत असलेल्या स्टाफचे मदतीने त्यास ताब्यात घेतले. सौरभ राजेंद्र भोसले (वय २३ वर्षे, रा. कोर्टी, सवडी, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. दुचाकी वाहनाबाबत चौकशी करता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा त्यास त्याचे ताब्यात असलेल्या वाहन सोबत घेवून पोलिस स्टेशनला आणुन त्याचेकडे असलेले दुचाकी वाहन क्र. एमएच १२ डीडी / २७६४ बाबत माहीती घेता. सदरचे वाहन हे चोरीचे असल्याची माहीती प्राप्त झाली व सदरबाबत कोंढवा पोलिस स्टेशनकडील अभिलेख तपासुन पाहता सदरबाबत कोंढवा पोलिस स्टेशन येथे गुरनं. १२५३ / २०२३ भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याची माहीती प्राप्त झाली. त्याअन्वये सदरचे वाहन जप्त करुन त्यास कोंढवा पोलिस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने एक वाहन आणखी एक दुचाकी चोरी केल्याचे सांगून त्याचेकडुन ती प्राप्त करण्यात आणुन कोंढवा पोलिस स्टेशनकडील गुरनं. १२५३ / २०२३ भादवि कलम ३७९ व कोंढवा पोलिस स्टेशनकडील गुरनं. ११५४/२०२३ भादवि कलम ३७९ असे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. अशा त-हेने वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरीता लावण्यात आलेल्या पेट्रोलींग दरम्यान एकुण ८ गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकास यश आलेले आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त परिमंडळ – ५ आर राजा, सहा. पोलिस आयुक्त वानवडी विभाग शाहुराव साळवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे कोंढवा पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले व संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे सपोनि दिनेशकुमार पाटील, सपोनि लेखाजी शिंदे, पोलिस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, लवेश शिंदे, सागर भोसले, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजीत मदन, शाहीद शेख या पथकाने केली आहे.

kashmir
कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईतांकडून ७ पिस्टल अन् काडतुसे जप्त…

कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…

कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक; १५ दुचाकी जप्त…

कोंढवा पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करुन आरोपींना उत्तर प्रदेशातून केले जेरबंद…

कोंढवा पोलिसांकडून दुचाकी चोरास अटक; पाहा दुचाकींचे क्रमांक…

कोंढवा पोलिसांनी गंभीर गुन्हयातील फरारी आरोपींना केले जेरबंद…

कोंढवा पोलिसांनी आरोपीकडून चोरीची चारचाकी, दुचाकी, मोबाईल केले जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!