पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची दारु वाहतूकीवर मोठी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागामध्ये अवैध रित्या दारु वाहतूकीवर कारवाई करून पॅगो टेम्पोसह एकूण २,४६,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना पुणे ते आपटी अशी दारु वाहतूकीचा अगर बाळणेचा कोणताही परवाना नसताना एका पॅगो टेम्पोमधून दारुची वाहतूक करीत आहे, अशी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. त्यांनी त्यांचेकडील व लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांचेसह मौजे अपटी गावचे हद्दीमध्ये पुणे ते अपटी रोडवर दबा धरुन बसून पॅगो कंपनीचा टेम्पो नं. MH12TU1473 व त्यामधील कि. रु. ९६,६६०/- रुपयांची दारु असा एकूण २,४६,६६० रुपयांचा माल ०६/१२/२०२३ रोजी पकडून त्यावरील चालकाविरुध्द लोणावळा ग्रामीणपोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक अकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व सत्यसाई कार्तिक, सहा. पोलिस अधीक्षक, लोणावळा विभाग, लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली वाचक सहा. पोलिस निरीक्षक सचिन राऊळ, पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पो. हवा. सिताराम बोकड, पो. ना. / किशोर पवार, पो. शि. सुभाष शिंदे यांनी सदरची कारवाई केली आहे.

लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड…

लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…

लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…

लोणावळा परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

लोणावळा येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा ताब्यात…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!