
संतोष पंडित जेलमधून सुटल्यावर म्हणाले; मनापासून माफी मागतो…
पुणे: यू-ट्युबवर संतोष पंडित यांना 16 सप्टेंबर रोजी 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला. त्यानंतर गुरुवारी (ता. 17) त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपीला काही अटी घातल्या आहेत. आरोपीने फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, तसेच प्रकरणातील कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अटी घातल्या आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडणारे आणि सरकारसह राजकीय नेत्यांना धारेवर धरणारे संतोष पंडित यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संतोष पंडित यांना अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले आहेत. बाहेर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जे काही घडलं तो मोठा शॉकच होता. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया संतोष पंडित यांनी दिली.
View this post on Instagram
यावेळी संतोष पंडित यांनी यापुढे अशाप्रकारचे व्हिडीओ बनवणार की नाही? यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. ‘मी जे काही करतोय तो माझा संवैधानिक अधिकार आहे. मी माझा अधिकार बजावत असतो. पहिल्यांदाही तो बजावत होतो आणि यापुढेही बजावत राहणार आहे. जे काही करत होतो ते सुरु करताना मी कोणाला विचारले नाही, तो माझा संवैधानिक अधिकार आहे, तो बजावत आलो आणि यापुढेही बजावत राहणार, मी थांबणार नाही. लोकशाहीत जनता देशाची मालक आहे. जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. आपण ज्यांना निवडून देतो, जे लोक सत्तेत आहेत, मग तो कोणताही पक्ष असो. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. मी वैयक्तिक टीका कोणावर केलेली नाही,’ असे पंडित यांनी म्हटले आहे.
“माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, पण कोणाला चुकीचे वाटलं असेल तर मी मनापासून माफी मागतो. माझा उद्देश जनतेचे भले व्हावे एवढाच आहे. मी समाजकार्य करत नाही, मी संवैधानिक अधिकार बजावतोय, तो मी बजावतच राहणार, थांबणार नाही”, असे संतोष पंडित यांनी स्पष्ट केले.
संतोष पंडित यांना जामीन मंजूर, पण कोर्टाने घातल्या दोन अटी; कोणत्या पाहा…
मोठी बातमी! संतोष पंडित यांची रवानगी होणार कारागृहात…
‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना’ पुस्तक नागरिकांसाठी उपयुक्त : डॉ. सदानंद दाते
पुणे जिल्ह्यात युवकाचा केला अत्यंत क्रूरपणे खून; धक्कादायक कारण समोर…
पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…
पुणे! प्रेमाच्या त्रिकोणातून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या…
पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…

