कराडच्या उड्डाणपूलावर महिला पोलिसानेच साजरा केला वाढदिवस अन्…

सातारा: कराडमध्ये महिला पोलीस अधिकारी सोनम पाटील यांनी कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यानच्या उड्डाणपुलावर ३१ ऑक्टोबरच्या रात्री वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी वाढदिवसाचं सेलिब्रेशन केल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चहूबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सोनम पाटील नावाची ही वाहतूक पोलीस कर्मचारी कोल्हापूर नाका-नंदलापूर उड्डाणपुलावर आपल्या नवीन कारसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु झाली. ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच, सोनम पाटीलने तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले. कराडमधील कोल्हापूर नाका-नंदलापूर उड्डाणपुलावर ३१ ऑक्टोबरच्या रात्री शूट झालेल्या या व्हायरल व्हिडिओमध्ये सोनम पाटील आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

व्हिडिओमध्ये सोनम पाटील आपल्या नवीन कारवर केक कापताना, कारच्या बोनेटवर बसून पोझ देताना, फुलांचा गुच्छ हातात धरुन फोटो काढताना आणि ‘पायरो गन’मधून निघणाऱ्या सोनेरी ठिणग्यांच्या वर्षावात वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. सेलिब्रेशनचा रील व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच याच उड्डाणपुलावर एक भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून, सार्वजनिक जागेचा वापर आणि तीही पोलीस पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे वैयक्तिक सेलिब्रेशनसाठी कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या व्हिडिओवर सर्वस्तरातून टीका होत आहे. सार्वजनिक रस्त्याचा वापर वैयक्तिक उत्सवासाठी का केला गेला आणि ज्या पोलीस कर्मचाऱ्यावर वाहतुकीचे नियम लागू करण्याची जबाबदारी आहे, तीच स्वतः नियमांचे उल्लंघन कसे करू शकते, असे प्रश्न विचारले जात आहेत.

दरम्यान, कोल्हापूर नाका आणि नंदलापूर यांना जोडणारा हा ३.५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाला आहे. जेव्हापासून या मार्गाचा वापर वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

बीड पोलिस अधीक्षकांच्या घरात धक्कादायक प्रकार, पोलिस कर्मचारी निलंबित…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

पोलिस अधिकारी संतोष केंद्रे यांची चपळाई; बादल कुटुंबियांकडून रोख बक्षीस जाहीर…

पुणे! लग्नासाठी चक्क पोलिस अधिकारी झाल्याचा बनाव! इम्प्रेशनसाठी लावले खोटे फ्लेक्स…

DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!