राजधानी पुन्हा हादरली! मित्रानेच तिला दगा; सामूहिक अत्याचार अन् निर्घुण हत्या…

नवी दिल्ली: एका १६ वर्षीय मुलीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार आणि हत्येची ही घटना उघडकीस येताच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत मुख्य आरोपीसह ४ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आपल्या एका मित्राला भेटायला गेली होती. मात्र मित्रानेच तिला दगा दिला. प्रथम मित्राने आणि नंतर त्याच्या इतर तीन मित्रांनी मिळून अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपींनी पीडितेची निर्घृण हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी कुशक रोड जवळील एका शेतात अल्पवयीन मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. मुलीच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या अनेक खुणा होत्या. प्राथमिक तपासात तिची ओळख पटू शकली नव्हती. मात्र, वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर तिच्यावर बलात्कार करून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घटनास्थळी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तपासादरम्यान अंधारात एक संशयित टेम्पो फिरताना दिसला. या टेम्पोचा मागोवा घेत पोलिस खड्डा कॉलनीपर्यंत पोहोचले. तेथून पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या संपूर्ण भयानक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.

मृत मुलगी शिक्षण सोडून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नोकरीच्या शोधात होती. ती आरोपींपैकी एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ओळखत होती. १० सप्टेंबरच्या संध्याकाळी ती त्याला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी त्या मुलाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर मुलीने पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली. पण नशेत असलेल्या आरोपीने आपल्या इतर तीन मित्रांना बोलावून घेतले. चौघांनीही तिच्यावर सामूहिक अत्याचार केला आणि ११ सप्टेंबरच्या पहाटे तिला शेतात घेऊन जात तिच्यावर चाकूने ६ हून अधिक वार करून तिची हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह चिखल आणि झाडांच्या पाल्याखाली लपवून टेम्पोतून पळ काढला.

पोलिस तपासात या गुन्ह्यात सहभागी असलेल्या शिवम उर्फ सुदामा (१९) याला अटक करण्यात आली असून त्याच्या इतर ३ अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेले २ चाकू, गुन्ह्याच्या वेळी घातलेले रक्ताने माखलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून दिल्लीत फेकून दिले…

जळगाव! ट्रॅक्टर मालकासह चौघांनी शेतात केला सामूहिक अत्याचार…

पुणे! आळंदी परिसरात घरात घुसून सामूहिक लैंगिक अत्याचार…

राजधानी हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर 2 तास सामूहिक अत्याचार; अंगावर काटा…

सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!