
संतोष पंडित यांना जामीन मंजूर, पण कोर्टाने घातल्या दोन अटी; कोणत्या पाहा…
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेबाबत यूट्यूबवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या युट्युबर संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
पुण्यातील सारिका कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने आपल्या यूट्यूब चॅनेलवरून महिला नगरसेविकेबाबत आक्षेपार्ह आणि समाजात गैरसमज पसरवणारे व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. या तक्रारीवरून कोथरूड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) कलम 67 अन्वये गुन्हा नोंदवून संतोष पंडित यांना अटक केली होती.
View this post on Instagram
सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, व्हिडीओमधील शब्दांचा वापर कोणत्याही हेतुपुरस्सर गैरवापरासाठी केलेला नाही. तसेच संबंधित महिलेच्या लज्जेचा अनादर करण्याचा कोणताही हेतू आरोपीचा नव्हता. दाखल गुन्ह्यांचे स्वरूप आणि कायद्यात नमूद असलेल्या शिक्षेची तरतूद लक्षात घेता आरोपीला अधिक काळ कोठडीत ठेवण्याची कोणतीही आवश्यकता नाही.
सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. आरोपीने सोशल मीडियावर वारंवार अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य केले असून हे कृत्य अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. आरोपीचे सोशल मीडिया अकाऊंट अद्याप सुरू असून, तो बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या प्रकरणातील सीडीआर (CDR) अहवाल आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास अद्याप शिल्लक आहे, असा युक्तिवाद करत सरकारी वकिलांनी जामीन फेटाळण्याची मागणी केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी यांनी संतोष पंडित यांना 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपीला काही अटी घातल्या आहेत. आरोपीने फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, तसेच प्रकरणातील कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अटी घातल्या आहे.
मोठी बातमी! संतोष पंडित यांची रवानगी होणार कारागृहात…
पुणे जिल्ह्यात युवकाचा केला अत्यंत क्रूरपणे खून; धक्कादायक कारण समोर…
पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…
पुणे! प्रेमाच्या त्रिकोणातून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या…
पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…

