मोठी बातमी! संतोष पंडित यांची रवानगी होणार कारागृहात…

पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अटकेत असलेले रीलस्टार संतोष पंडित यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज (मंगळवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. संतोष पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता संतोष पंडित यांची रवानगी कारागृहात होणार आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे मध्यरात्री पुणे पोलिसांनी संतोष पंडित यांना अटक केली होती. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर पुणे पोलिसांनी संतोष पंडित यांना न्यायालयात हजर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपातून संतोष पंडित यांच्यावर पुण्यातील कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा करण्यात आला होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संतोष पंडित यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. तपासासाठी न्यायालयाने यापूर्वी ८ सप्टेंबरपर्यंत पंडित यांना पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज पंडित यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता त्यांची रवानगी कारागृहात होणार आहे. पंडित यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील व्हिडिओ आणि संबंधित आक्षेपार्ह मजकुराचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, संतोष पंडित यांच्या अटकेमुळे सोशल मीडियासह नागरिकांमधून टीका होत आहे.

पुणे शहरात गांजा पिणाऱ्यांनी पोलिसाचा चिरला कोयत्याने गळा..

पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…

पुणे जिल्ह्यात युवकाला पत्नी अन् मुलासमोरच संपवल्याचं कारण आलं पुढे; प्रेमसंबंध…

पुणे शहरातील कसबा पेठ हादरली! नवऱ्याने दाबला रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर अन्…

पुणे! ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस? एक्स बॉयफ्रेंडवर कोयत्यानं हल्ला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!