
पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…
पुणे : पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरात मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम यांचे निलंबन अखेर मागे घेतले आहे. त्यांना पुन्हा सेवेत हजर करून घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. डेक्कन पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप कदम यांनी काठीने कॅफेधील कॉफीचे काही ग्लास पाडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्यानंतर त्यांना सेवेतून २९ जून रोजी निलंबित केले होते.
View this post on Instagram
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या कॅफेवर कारवाई करणाऱ्या उपनिरीक्षकावरच निलंबनाची कारवाई केल्याने पोलिस दलात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले. या आधी पोलिसांनी त्या कॅफेविरुद्ध सहा खटले दाखल केले होते, मात्र तरीही ते सुरू राहत होते हे समोर आले आहे. PSI संदीप कदम यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. उपनिरीक्षकाने त्याचे कर्तव्य पार पाडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ८ जुलै रोजी झालेल्या आढावा समितीच्या बैठकीत कदम यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली.
View this post on Instagram
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल तसेच खाद्यपदार्थांच्या गाड्या, पानटपऱ्या रात्री दहापूर्वी बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप कदम यांनी मध्यरात्री दोन पर्यंत सुरू असलेल्या गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) संबंधित हॉटेलविरुद्ध कारवाई केली होती. संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. उपनिरीक्षकाने त्याचे कर्तव्य पार पाडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ८ जुलै रोजी झालेल्या आढावा समितीच्या बैठकीत कदम यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली आहे.
राज्यभरातून ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ या पुस्तकाला मोठी मागणी
Video : पुणे पोलिस दलातील PSI संदीप कदम यांचे निलंबन…
पुणे! विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलिस अधिकारी निलंबित, पाहा नावे…
पुणे! लाच प्रकरणातील API वैशाली तोटेवार निलंबित…
पुणे! आयटी क्षेत्रातील युवक-युवतीला पकडणारे तिघं पोलिस निलंबित…
पुणे पोलिस आयुक्तांचे PRO सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याचं निलंबन…
पुणे पोलिस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबणाची कारवाई…

