
पुणे! ‘शिवाई’ बसने दाम्पत्याला चिरडले; पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू…
पुणे : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर आज (सोमवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शिवाई बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. महेंद्र नाझीरकर (वय ३५) आणि रेश्मा नाझीरकर (वय ३२, रा. नाझरे ) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी पती-पत्नीचे नाव आहे.
नाझीरकर दांपत्य सकाळी आठच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून जेजुरी-मोरगाव रस्त्याने प्रवास करत होते. याच दरम्यान समोरून येणाऱ्या शिवाई बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीचा चक्काचूर झाला आणि महेंद्र नाझीरकर व रेश्मा नाझीरकर हे दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर फेकले गेले. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या अपघाताप्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील दोघांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नाझीरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…
पुणे! Wipro कंपनीतील IT इंजिनिअर युवतीचा खून; Infosys मधील प्रियकराला अटक…
पुणे! कॉलेजच्या लिफ्टमध्ये विद्यार्थिनी अडकली तब्बल 14 तास…
पुणे! शिक्षिकेला लेकीच्या वाढदिवसादिवशी संपवलं, आरोपी निघाले…
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्यात पोलिस कर्मचाऱ्याकडून कार घुसवण्याचा प्रयत्न अन्…

