पुणे! शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार, एकाचे हात तोडले, बंदूक टाकून आरोपी फरार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील गेट नंबर 4 वर ही घटना घडली असून कोयत्याचे वार झाले आहेत. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चार ते पाच जणांकडून हा गोळीबार झाला आहे. पोलिसांनी या घटनेनंतर परिसर सील केला आहे.

सदर घटनेनंतर वरिष्ठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचे दोन्ही हात छाटले गेल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आता न्यायालयाच्या दारातच हत्या झाल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घटनास्थळी दोन बंदूका आणि गोळ्या पडल्याचं दिसून येत आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे. तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एकूण सहा जण होते. कोयते आणि बंदूका घेऊन आरोपी आले होते, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते, अशा गर्दीच्या वेळी ही घटना घडली आहे. यामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. तर या घटनेत जखमी झालेला व्यक्ती कोर्टात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटना घडल्यानंतर पोलिस काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, गोळीबार करणारा अज्ञात आहे, तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एका गाडीवरती तिघे तर दुसऱ्या गाडीवरती चौघे जण आलेले होते, मोठी गर्दी होती, कोणीही वाचवायला पुढे गेलेले नाहीत, त्या आरोपींकडे कोयते आणि बंदूका होत्या, त्यामुळे परिसरात एकच भीती पसरली, पोलिस आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनेची चौकशी केल्यानंतर तपास झाल्यानंतर माहिती देऊ अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…

पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…

पुणे-मुंबई महामार्गावरील पहाटेचा सुमारास थरार; पोलिसांवरच गोळीबार…

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास गोळीबार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!