पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघातात 3 मित्रांचा जागीच मृत्यू…

पुणे: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कटकेवाडी-विठ्ठलवाडी गावाच्या वेशीवर सोमवारी (ता. २३) पहाटे दीडच्या सुमारास भरधाव कारचा भीषण अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात तिन मित्रांचा जागीच मृत्यू तर दोघे जण जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे वाघोली परिसरात शोककळा पसरली आहे.

ओंकार अजय सूर्यवंशी (वय २४), शंकर वासुदेव ढोळे (वय २२, दोघे रा. प्रभूरामनगर, वाघोली) आणि मयूर सतीश औटी (वय २७, रा. वाघोली, मूळ रा. पारनेर) या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर आशुतोष नंदकुमार मरकड (वय २८) आणि प्रणय भरत शिंदे (वय २४) हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्यानंतर अपघात झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी आणि ढोळे हे इस्टेट एजंटचे काम करत होते, तर मयूर औटी याचे वाघोलीत वाहनांच्या सुट्या भागांचे वर्कशॉप होते. रविवारी रात्री हे पाचही मित्र जेवणासाठी बाहेर गेले होते. सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास जेवण आटोपून ते वाघोलीहून घरी परतत होते. विठ्ठलवाडी कमानीजवळ आले असता, कार चालवणारा मयूर याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक चढून दुसऱ्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या धडकेत चालक मयूर आणि पाठीमागे बसलेले दोघे जण जागीच ठार झाले.

दरम्यान, या घटनेनंतर मयूरचा मित्र कैफ अन्सारी याने हळहळ व्यक्त केली. “मयूरने रविवारी सायंकाळी सहा वाजता फोन करून रात्री जेवायला जायचं असल्याचं सांगितले होते. पण काही कामामुळे मला जाणं जमलं नाही. पहाटे कारचा अपघात होऊन मयूर आणि त्याच्या मित्रांचा मृत्यू झाल्याचे समजले. घडलेली घटना खूप दुर्दैवी आहे; पण मी रात्री जेवायला गेलो नाही, म्हणून वाचलो,” असे सांगताना कैफ अन्सारी याचे डोळे पाणावले.

पुणे! ‘शिवाई’ बसने दाम्पत्याला चिरडले; पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू…

पुणे! Wipro कंपनीतील IT इंजिनिअर युवतीचा खून; Infosys मधील प्रियकराला अटक…

स्वारगेट अत्याचार प्रकरण! पीडित युवतीला सुनावणीवेळी रडली ढसाढसा…

राजस्थानमध्ये झालेल्या भीषण अपघात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा जागीच मृत्यू; पाहा मृतांची नावे…

पुणे! शिक्षिकेला लेकीच्या वाढदिवसादिवशी संपवलं, आरोपी निघाले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!