नांदेड! प्रेमसंबंध अन् जे होईल ते होईल, आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू…

नांदेड : प्रियकराने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून प्रेयसीच्या चुलत्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना नांदेड शहरातील सांगवी परिसरातील आसना पुलाजवळ शुक्रवारी मध्यरात्री घडली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सचिन यशवंत काळे (रा. नुरी चौक, नांदेड) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून विमानतळ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या ६ तासांत मुख्य संशयितासह त्याच्या तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. मृत सचिनच्या अल्पवयीन पुतणीचे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील रहिवासी असलेल्या राजेश दत्ता राजेगोरे (वय २२) या युवकासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या महिन्यात या दोघांनी घरातून पळ काढला होता. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र, अवघ्या २४ तासांतच ती मुलगी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाली आणि तिने मी मामाच्या गावी गेले होते, असे सांगितले. पोलिसांमार्फत तिचे समुपदेशन करून तिला पालकांच्या ताब्यात दिले. परंतु, या घटनेमुळे मुलीचे काका सचिन काळे आणि राजेश राजेगोरे यांच्यात वाद सुरू होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दोघांमध्ये सतत खटके उडत होते. हा वाद नेहमीसाठी संपवण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपी राजेश याने सचिनला मध्यरात्री सांगवीजवळील आसना ब्रिजवर चर्चेसाठी बोलावले. “जे होईल ते होईल, आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू”, असे म्हणत त्याने सचिनला विश्वासात घेतले. मात्र, तो सचिनचा समेट घडवण्याचा नाही, तर त्याचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित कट होता. आरोपींनी कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी सोबत दांडा नसलेली लोखंडी कुऱ्हाड खिशात लपवून आणली होती. आसना पुलावर वाद वाढताच राजेश आणि त्याच्या साथीदारांनी ती कुऱ्हाड हातात घट्ट धरून सचिनच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सचिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल होताच विमानतळ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी अवघ्या ६ तासांत चारही आरोपींना वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेतले. राजेश दत्ता राजेगोरे (वय २२, मुख्य आरोपी), बालाजी राजेगोरे (वय २१), आत्माराम कदम (वय २०) आणि आणखी एक साथीदार अशा चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या…

जळगाव! युवक साखरुपड्यानंतर गेला प्रेयसीसोबत लॉजवर अन्…

लातूर! नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् प्रेयसीला अडकविण्यासाठी जीव गेला चिमुकल्याचा…

विवाहबाह्य संबंध अन् ‘कार्यक्रम ओके’ म्हणून प्रियकराचा फोन…

पुणे! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने केला खून; आरोपी जेरबंद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!