मुंबई! पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीनंतर फटाके वाजवणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली…

मुंबईः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पोलिस ठाण्यात एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने तिच्या वरिष्ठांची बदली झाल्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारात फटाके वाजवून सेलिब्रेशन केले होते. यानंतर आता संबंधित महिला कॉन्स्टेबलचीही अंधेरी पोलिस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे. या महिलेने आपल्या वरिष्ठांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांची मुंबई पोलिस विशेष शाखा-1 मध्ये बदली करण्यात आली होती.

उमेश मच्छिंद्र यांच्या बदलीचा आदेश निघाल्यानंतर या महिला कॉन्स्टेबलने पोलिस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून आनंद साजरा केला होता. गेल्या आठवड्यात मंगळवारी घडलेला हा प्रकार पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिस दलात या सगळ्याची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर आता काही दिवसांतच संबंधित महिला कॉन्स्टेबलचीही अंधेरी पोलिस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याची माहिती आहे. या महिला कॉन्स्टेबलला अंधेरी पोलिस ठाण्यातून तातडीने कार्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, बदली करण्यात आलेल्या महिलेचा पती IPS अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्याची भीती दाखवून संबंधित महिला कर्मचारी अंधेरी पोलिस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी आणि त्यांच्यावर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांना महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्याने केला होता. संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर मच्छिंद्र यांची बदली झाल्याची कुजबुज सुरु आहे. महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवर विभागीय चौकशी न करताच उमेश मच्छिंद्र यांची बदली झाल्याचीही चर्चा पोलिस दलात सर्वत्र रंगली आहे. संबंधित महिला कर्मचारी कामे टाळत असल्याचा, काम सांगितल्यास आत्महत्येची धमकी देत असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची अचानक बदली; फटाके वाजवून सेलिब्रेशन अन् महिला कॉन्स्टेबलची दहशत…

सीआयडीच्या पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या रोखठोक वक्तव्यानंतर बदली रद्द…

पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली; अन्याय झाल्याची भावना…

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्यात पोलिस कर्मचाऱ्याकडून कार घुसवण्याचा प्रयत्न अन्…

एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्टमधील पोलिस अधिकाऱ्याचे निधन…

पोलिस उपनिरीक्षकाने खाकी वर्दीतच धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!