धक्कादायक! आरोपीवर बलात्काराचा गुन्हा अन् कारागृहातून बाहेर येताच 6 जणांना संपवलं…

हैद्राबाद: एका पोस्को गुन्हातील आरोपीने जामीनावर बाहेर आल्यानंतर कुटूंबियांसह आरोप करणाऱ्या 17 वर्षाच्या मुलीसह तिच्या कुटूंबियांना संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने 6 खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी राजकुमार याने प्रथम पत्नीची (वय ३०), 4 वर्षांच्या मुलाची आणि 18 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. यानंतर तो सुमारे 6 किलोमीटर दूर एका गावात पोहोचला. जिथं त्याने 17 वर्षांच्या मुलीची, तिच्या आईची आणि आजीची हत्या केली. मृत मुलीने 16 मे रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत राजकुमारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, ज्यामुळे तो कारागृहात गेला होता. तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

आरोपीच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने आठ-दोन आठवड्यांत संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याला चौकशीसाठी किंवा रिमांडसाठी नेण्यात आले नाही, असे म्हणत पिडित मुलीच्या कुटूंबियांनी धक्कादायक आरोप केले आहेत.

घटनेच्या वीस दिवसांनंतर, तो मोकाट फिरत असून मुलीला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे, असे सांगून आम्ही त्याच्याबद्दल पुन्हा तक्रार केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याची जामिनावर सुटका झाली. त्याने लाच दिली आणि प्रकरण दाबण्यात आले. आता त्याने त्या मुलीची हत्या केली आहे आणि हे सर्व पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडले, असे आरोप मुलीच्या मामाने केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सोलापूर! लग्नानंतर दोनच महिन्यात समजलं पत्नीचं प्रेम प्रकरण अन्…

राज्यभरातून ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ या पुस्तकाला मोठी मागणी

प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…

नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी बातमी! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!