
राजधानी हादरली! युवतीवर कॅफेत सामूहिक अत्याचार, तिघांना अटक…
नवी दिल्ली: एका युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यात चार पुरुष आणि दोन महिला अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित युवती (वय २२) एका मॉलमधील कॅफेमध्ये काम करते आणि आरोपीही याच कॅफेमध्ये तिचे सहकारी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवतीसह एकूण आठ जण राजधानी दिल्लीतील प्रीत विहार येथील एका कॅफेमध्ये रात्री गेले होते. तिथे सर्वांनी पार्टी केली. रात्री साडेअकराच्या सुमारास कॅफे बंद करण्यात आला. मात्र, पार्टीत सहभागी असलेल्या एका व्यक्तीकडे कॅफेची चावी होती. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा कॅफे उघडण्यात आला. सर्वजण आत जाऊन पार्टी करू लागले. या दरम्यान आठही जणांनी मद्यपान केले.
View this post on Instagram
पहाटे साडेतीनच्या सुमारास सर्वजण कॅफेतून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच युवतीने दोन युवकांनी आपल्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप केला, तर उर्वरित सहकाऱ्यांनी या कृत्यात त्यांना साथ दिल्याचं तिने तक्रारीत नमूद केले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामूहिक अत्याचारासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघी महिला आणि एका पुरुषाला अटक केली असून, उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, घटनेनंतर युवती थेट पोलिस ठाण्यात न जाता एका मित्रासोबत दुसरीकडे गेली होती; त्यांच्यासोबत आणखी दोन तरुणीही होत्या. या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्यात सर्वजण एका वाहनातून जाताना दिसत आहेत. अखेर पहाटे पावणेसहाच्या सुमारास युवती पोलिस ठाण्यात पोहोचली आणि तिने तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला असून कॅफेतील उपस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिस घटनाक्रम जोडत आहे. पोलिसांकडून अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
राजधानी हादरली! मित्राला पकडले अन् मुलीवर सामूहिक बलात्कार…
रिक्षाचालकाचा रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपी फरार…
अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून दिल्लीत फेकून दिले…
धक्कादायक! आरोपीवर बलात्काराचा गुन्हा अन् कारागृहातून बाहेर येताच 6 जणांना संपवलं…
महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार…

