
केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…
पुणे: केतन अग्रवाल याची त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने लोहगडावरुन ढकलून देत हत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या हायप्रोफाईल प्रकरणात आता पोलिस चौकशीदरम्यान सातत्याने नवीन माहिती समोर येत आहे.
सिया गोयल हिला केतन अग्रवाल याच्याशी लग्न करायचे नव्हते. तिचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध होते. सिया आणि केतन यांच्या लग्नासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी तयारी केली होती. मात्र, सियाला केतन हा आवडत नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील दोन उणीवा सियाला खटकायच्या. केतनला टक्कल होते. तो केसांचा टोप वापरत होता. ही गोष्ट अनेकांना माहिती नव्हती. याशिवाय, केतन बोलताना अडखळायचा. सिया आणि केतनचे लग्न ठरले तेव्हा गोयल कुटुंबाला या गोष्टीची माहिती होती. मात्र, त्यांना याचे फारसे विशेष वाटले नाही. परंतु, या दोन गोष्टींमुळे सियाला केतन पसंत नव्हता. दुसरीकडे सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्यावर प्रेम होते.
View this post on Instagram
केतनची हत्या करण्याऐवजी तू घरच्यांना सांगून सरळ लग्नाला नकार का दिला नाहीस, असा प्रश्नही सिया गोयल हिला पोलिसांनी विचारला. त्यावर ती म्हणाली की, मला माझ्या कुटुंबीयांना दुखवायचे नव्हते. हे लग्न मोडले असते तर आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. त्यापेक्षा केतनला मार्गातून कायमचा दूर करणे, हा सर्वात सोपा उपाय वाटला, असे सियाने सांगितले. केतन लोहगडावर ट्रेकिंगला गेला असताना पडला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्यावर फारसे प्रश्न उपस्थित होणार नाहीत. गडावर फारसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ही गोष्ट कोणालाही समजणार नाही, असे सिया गोयल हिला वाटत होते.
दरम्यान, पोलिसांनी सिया गोयल हिला अटक केल्यापासून तिच्या कुटुंबातील एकही व्यक्ती तिला भेटायला आलेली नाही. सियाचे वडील हे सध्या रुग्णालयात आहेत. लोणावळा पोलिसांनी शुक्रवारी तिचा भाऊ साहील गोयल चौकशीसाठी बोलावले आहे. तो सध्या पोलिस ठाण्यात असून त्याची चौकशी सुरु आहे.
खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…
पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…
सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…
सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…
केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

