घटस्फोटाचा निकाल लागताच महिलेवर सपासप वार करत संपवलं…

वर्धा : वर्धा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी महिलेची भररस्त्यात चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मंजू संदीप पचारे (वय 24, मूळ रा. पाचखेड, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी मंजूचा विवाह संदीप रामू पचारे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर संदीप हा दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करीत असल्याने मंजूने त्याचे घर सोडले आणि वडील राजकुमार पारसे यांच्याकडे राहू लागली. मंजूने पती संदीप रामू पचारे याच्याविरोधात वर्धा येथील न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल 25 जून 2026 रोजी लागल्याची माहिती तिचे वडील राजकुमार पारसे यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मंजू शेतातून काम करून शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घरी आली. वारीसपुरा येथील घरी डबा ठेवून ती वडिलांसाठी पाण्याची बाटली घेऊन शुक्रवार बाजारातील दुकानाकडे निघाली होती. सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हिरणवार गल्लीत अज्ञात आरोपीने तिच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. मंजू रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी तिचा मोबाईल घेऊन शुक्रवार बाजाराच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…

मोठी बातमी! नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल…

प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…

नाशिकमध्ये महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह; अनैतिक प्रेमसंबंधातून संपवलं…

अनैतिक संबंधाचा संशय अन् आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस काय म्हणत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!