मला जगणं असह्य झालंय म्हणून पती रडत होते: नेहा देसाई

मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलीसांनी फायनलान्स कंपनीच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी रायगड पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल केली. नेहा देसाई यांनी तक्रारीत आपले पती नितीन देसाई यांना फायनान्स कंपनीकडून स्टुडिओच्या कर्जासंदर्भात मानसिक त्रास दिला गेल्याचं आणि दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. तसेच अनेक दिवस नितीन देसाई हे मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनीच स्थापन केलेल्या एन. डी. स्टुडिओमध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीने त्यांच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट करत अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्या पत्नीने ५ जणांवर त्यांना मानसिक ताण देण्यात आला असल्याचा आरोप केला आहे.

नितीन देसाईंची पत्नी नेहा यांनी एफआयआर कॉपीमध्ये म्हटले आहे की, ‘रशेष शहा, केयूर मेहता, स्मित शहा, आरके बन्सल आणि जितेंद्र कोठारी माझ्या पतीला गोड बोलून आश्वासन देत होते आणि दुसरीकडे कर्ज परतफेडीसाठी प्रेशर आणत होते. त्यांच्या अशा खोट्या आणि लबाड वागणुकीमुळे माझे पती मानसिक तणावाखाली होते. माझे पती यांचेवर सतत दडपण असल्याने ते घरामध्ये कोणाशीच न बोलणे, गप्पगप्प राहणे किंवा चिडचिडेपणा करत असत. मार्च २०२३ मध्ये आम्ही दोघे घरात असताना माझे पती रडत होते आणि काही लोक माझ्या स्वप्नातील स्टुडिओ गिळंकृत करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मला जगणं असह्य झाले असल्याचे म्हणत होते. पण मी त्यांना वारंवार धीर देत होते. या सगळ्यांच्या दबावामुळे इच्छा नसतानाही माझ्या पतीला आत्महत्या करण्यास भाग पाडले.’

दरम्यान, नितीन देसाई यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर फायनान्स कंपनीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आम्ही जे काही केलं ते सर्व कायद्यानुसार केले आहे. आरबीआयच्या नियमानुसार केले असून कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. नितीन देसाई यांच्या मृत्यूचे आम्हालाही खूप दु:ख आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

नितीन देसाई यांच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; सेलिब्रिटींनी फिरवली पाठ…

नितीन देसाई यांच्या पत्नीने केले गंभीर आरोप; तक्रारीत म्हटले की…

नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर…

नितीन देसाई यांच्या आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ क्लिप; पहिले वाक्य…

नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…

मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!