हृदयद्रावक! पत्नीला वाढदिवशीच समजली प्राध्यापक पतीच्या मृत्यूची बातमी…

मुंबईः मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील मालाड स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (वय 31) या प्राध्यापकाचा पोटात चिमटा खुपसून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आलोक सिंह यांची पत्नी पूजा यांना वाढदिवशीच पतीच्या मृत्यूची बातमी समजल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ओंकार एकनाथ शिंदे (वय 27) याने आलोक सिंह यांच्या पोटात चिमटा खुपसला होता आणि त्यानंतर तो पळून गेला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ओंकार शिंदे याला बेड्या ठोकल्या आहेत. आलोक सिंह हे गणित विषयाचे प्राध्यापक होते, ते एनएम महाविद्यालयात कार्यरत होते. शनिवारी संध्याकाळी ते नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनने विलेपार्ले येथून मालाडला येत होते. त्यावेळी ट्रेनमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरुन ओंकार शिंदे याच्याशी त्यांचा वाद झाला आणि हा सगळा प्रकार घडला.

Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

आलोक कुमार सिंह हे मितभाषी आणि शांत स्वभावाची व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांचे दोन वर्षांपूर्वी पूजा यांच्याशी लग्न झाले होते. पूजा सिंह या बीएडचे शिक्षण घेतात. ज्यादिवशी आलोक कुमार सिंह यांच्यावर ट्रेनमध्ये हल्ला झाला त्यादिवशी पूजा यांचा वाढदिवस होता. आलोक व पूजा यांनी शनिवारी संध्याकाळी डिनरला जायचे ठरवले होते. त्यासाठी आलोक सिंह मालाडच्या कुरार व्हिलेज येथील आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकात आले, पण ते घरी पोहोचू शकले नाहीत. त्यापूर्वीच ओंकार शिंदे याने त्यांच्या पोटात धारदार चिमटा खुपसला. हा घाव अत्यंत खोल असल्याने आलोक सिंह यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर सुरुवातीला पूजा सिंह यांना आलोक यांचा किरकोळ अपघात झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असे कुटुंबीयांनी पूजा यांना सांगितले होते. अखेर रविवारी वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पूजा यांना आलोक यांचा मृत्यू झाल्याची बातमी सांगितली. आलोक सिंह यांचे वडील देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातील कमांडो आहेत. आपल्या मुलाच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ते रविवारी मुंबईत पोहोचले. या घटनेमुळे संपूर्ण सिंह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…

हृदयद्रावक! आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे. लवकर या…

हृदयद्रावक! बहिण-भावावर एकाचवेळी अंत्यसंस्कार, आई-वडिलांची भेट राहिली अधुरी…

हृदयद्रावक! शिक्षकांचा संप अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जागेवर जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!