
हृदयद्रावक! बहिण-भावावर एकाचवेळी अंत्यसंस्कार, आई-वडिलांची भेट राहिली अधुरी…
छत्रपती संभाजीनगर : आडगाव बुद्रुकजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणेश संजय सुरडकर (वय 30) आणि त्याची बहीण निशा सुरडकर (वय 25) अशी दोघांची नावे आहेत. करंजखेडा येथे दोघांचेही रविवारी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.
बहिण-भाऊ नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे राहात होते. रविवारी सुटी असल्याने ते शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीने (एमएचक्यू 3260) गावाकडे निघाले होते. आडगाव बुद्रुकजवळ समोरून आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की गणेशचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेली निशा रुग्णालयात दाखल असताना रविवारी पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

निशा ही छत्रपती संभाजीनगरातील निमाई हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती, तर गणेश एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. सुटीचा दिवस कुटुंबासोबत घालवण्यासाठी दोघे गावाकडे येत होते. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर पडून तडफडत असलेल्या भावंडांना महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र दोघांचेही प्राण वाचवणे शक्य झाले नाही. या घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या मागे आई-वडील आणि विवाहित मोठी बहीण असा परिवार आहे.
दरम्यान, अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मते पोलिस रात्री घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असते तर चौकशी झाली असती, आणि आरोपीला ताब्यात घेणे सोपे झाले असते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! शिक्षकांचा संप अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जागेवर जीव…
पुणे! युवतीने 9व्या मजल्यावरून घेतली उडी; हृदयद्रावक चिठ्ठी…
हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…
हृदयद्रावक! महिला डॉक्टरनं घेतला ओव्हरडोस अन् इंजेक्शन; कारण आलं समोर…
हृदयद्रावक! मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा पुढे झाली अन् भाऊही पळत आला…

