
निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला पैशांसाठी पत्नी-मुलांकडून बेदम मारहाण…
भोपाळ (मध्य प्रदेश): शिवपुरी जिल्ह्यात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला (डीएसपी) पत्नी आणि दोन मुलांनी दोरीने बांधून बेदम मारहाण केल्याची घटना भौंटी पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
प्रतिपाल सिंह यादव (वय ६२) हे डीएसपी पदावरून ३१ मार्च रोजी श्योपूर जिल्ह्यातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशावरून घरात वाद सुरू होते. पत्नी आणि दोन मुलांनी प्रथम निवृत्त डीएसपीला मारहाण केल्यानंतर त्यांचे दोन्ही पाय दोरीने बांधले आणि ओढले. एक मुलगा त्यांच्या छातीवर बसला, तर दुसऱ्याने त्यांचे पाय धरून त्यांना ओढले. यादरम्यान, त्यांची पत्नीही पतीला मारहाण करत होती. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भांडणाचा आवाज ऐकून शेजारचे घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी निवृत्त डीएसपीचे एटीएम कार्ड आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
प्रतिपाल सिंह यादव यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत आहे. त्यांची पत्नी दोन्ही मुलांसह झाशीमध्ये राहते. त्यांची मुलगी गोरखपूरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. २० ऑगस्ट रोजी त्यांची पत्नी माया यादव त्यांच्या मुलांसह आकाश आणि आभाससोबत गावात आली. तिने निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांची मागणी केली. मी त्यांना पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी मला जबरदस्तीने झाशीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मुलांनी त्यांना पकडले आणि पत्नीने मोबाईल आणि एटीएम हिसकावून घेतले. दरम्यान, शेजारचे हस्तक्षेप करण्यासाठी आले तेव्हा तिघेही पळून गेले. मोठ्या मुलाला ५ लाख आणि धाकट्या मुलाला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या मुलीचे लग्न करायचं आहे म्हणून त्यांना वाद आणखी वाढवायचा नाही. प्रतिपाल सिंह यादव यांना निवृत्तीनंतर ईपीएफमधून २० लाख रुपये मिळाले आहेत. ग्रॅच्युइटी आणि इतर रकमेमध्ये ३३ लाख रुपये अद्याप मिळणे बाकी आहे.’
प्रतिपाल सिंग यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पिचोर एसडीओपी प्रशांत शर्मा म्हणाले की, हा पैशांवरून झालेल्या हल्ल्याचा गुन्हा आहे आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
पुणे! पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
वाहतूक पोलिसांना जमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण…
पुणे शहरात भररस्त्यात पोलिसाला युवकाने केली मारहाण…
पुणे शहरात गाडी अडवली म्हणून दोघांची पोलिसाला जबर मारहाण…
पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…

