
पंढरपूर! वयाच्या सत्तरीमधील प्रेम अन् वृद्ध प्रेयसीने केले नको ते कांड…
सोलापूर: पंढरपूर तालुक्यामध्ये वयाच्या सत्तरीमधील दोन वृद्धांच्या प्रेमप्रकरणातून एका ७० वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी ‘डीएनए’ (DNA) चाचणीच्या अहवालावरून मृतदेहाची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सूत्रे फिरवून आरोपी वृद्ध महिलेला गजाआड केले आहे.
अंबादास खांडेकर (वय ७०) आणि मंगल होनमाने (वय ६५) या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध आणि प्रेमप्रकरण सुरू होते. २७ जुलै रोजी या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले. रागाच्या भरात मंगल हिने एका शेतामध्ये अंबादास यांची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिने त्यांचा मृतदेह अर्धवट जाळून टाकून तेथून पळ काढला.
View this post on Instagram
दरम्यान, २ ऑगस्ट रोजी परिसरातील शेतात एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने आणि कोणताही पुरावा नसल्यामुळे पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. तपासादरम्यान पोलिसांनी अंबादास खांडेकर यांच्या दोन मुलींचे ‘डीएनए’ नमुने घेत चाचणीसाठी पाठवले. घटनेच्या तब्बल दीड महिन्यानंतर आलेल्या डीएनए अहवालावरून तो मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाची ओळख पटताच पंढरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत मंगल होनमाने हिला ताब्यात घेतले आहे.
पोलीस कोठडीत मंगलची कसून चौकशी केली असता, प्रेमप्रकरणातील भांडणातून आणि वादातूनच अंबादास यांची हत्या केल्याची कबुली मंगल हिने दिली. वयाच्या सत्तरीमधील प्रेम आणि विचित्र घटनेनं संपूर्ण पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सोलापूर हादरलं! प्रेमप्रकरणातून युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण, अखेर मृत्यू…
सोलापूर! लग्नानंतर दोनच महिन्यात समजलं पत्नीचं प्रेम प्रकरण अन्…
सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…
सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…
सोलापूर! मुलाचे गावातील महिलेसोबत प्रेमसंबंध; आईने केला विरोध अन्…

