
एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्टमधील पोलिस अधिकाऱ्याचे निधन…
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक (psi) विजय सांगडे (वय ५७) यांचे कर्तव्यावर असतानाच निधन झाले. आज (सोमवार) सकाळी ते ड्युटीवर आल्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना छातीत दुखू लागल्यानंतर चक्कर आली. त्यांनतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विजय सांगडे यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात विजय सांगडे हे कार्यरत होते, गेल्या तीन वर्षांपासून ते एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमध्ये कार्यरत होते. डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये आपल्या कुटुंबसोबत राहत होते. त्यांच्या निधनानंतर पोलिसांकडून त्यांना बंदुकीच्या तोफेतून अखेरची सलामी देण्यात आली. आता, त्यांच पार्थिव सांगडे यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, दिवंगत पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय परिसरात ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून मानवंदना आणि श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ -१ बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ प्रशांत कदम सह इतर वरिष्ठ पोलीस उपस्थित होते.
पुणे! पोलिस अधिकारी गणेश तनपुरे यांचे हृदयविकाराने निधन; दोन दिवसांवर आली होती बदली…
Video: पोलिस अधिकाऱ्याची राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ठरली अखेरची…
पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू…
नाशिक! महिला IPS अधिकारी स्मिती चौधरी यांचे निधन…
मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…

