
राजधानी हादरली! मित्राला पकडले अन् मुलीवर सामूहिक बलात्कार…
नवी दिल्ली: राजधानीमधील प्रसिद्ध कालकाजी मंदिराच्या जवळ असलेल्या आस्था कुंज पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा छडा लावण्यात दिल्ली पोलिसांना मोठं यश आले आहे. आसिफ असे या आरोपीला पकडण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पीडित मुलगी तिच्या एका मित्रासोबत कालकाजी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेतल्यानंतर सोमवारी संध्याकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास दोघेही जवळच असलेल्या आस्था कुंज पार्कमध्ये जाऊन बसले होते. काही वेळातच २५ ते ३० वयोगटातील तीन तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी स्वतःला पोलिस कर्मचारी असल्याचे सांगत दोघांची चौकशी करण्यास सुरुवात केली आणि त्यांना धमकावले. यानंतर आरोपींनी अल्पवयीन मुलाला पकडून ठेवले आणि त्या १७ वर्षांच्या मुलीवर तिघांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
View this post on Instagram
दरम्यान, घडलेल्या या घटनेनंतर रात्री ८:४५ वाजता पीडित मुलीने स्वतः पोलिस कंट्रोल रूमला कॉल करून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. तोपर्यंत तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्यासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला.
आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी पार्कातील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अमर कॉलनी परिसरात सापळा रचला. मात्र पोलिसांना पाहताच एका आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांनी आसिफ नावाच्या आरोपीला अटक केली. सध्या पोलिस आरोपी आसिफची सखोल चौकशी करत असून त्याच्या इतर दोन साथीदारांची माहिती मिळवत आहेत.
राजधानी पुन्हा हादरली! मित्रानेच तिला दगा; सामूहिक अत्याचार अन् निर्घुण हत्या…
अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून दिल्लीत फेकून दिले…
जळगाव! ट्रॅक्टर मालकासह चौघांनी शेतात केला सामूहिक अत्याचार…
पुणे! आळंदी परिसरात घरात घुसून सामूहिक लैंगिक अत्याचार…
राजधानी हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर 2 तास सामूहिक अत्याचार; अंगावर काटा…

